How To Stay Fit Without Going To Gym : सध्या धकाधकीचं जीवन, आहाराच्या बदललेल्या सवयी आणि ताणतणाव इत्यादींमुळे आरोग्याशी निगडित समस्या वाढलेल्या आहेत. अनेकजण फिट राहण्यासाठी जिम जॉईंट करतात, मात्र त्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. तेव्हा तुम्हाला अशा सवयींबद्दल सांगणार आहोत ज्याचा अवलंब तुम्ही दररोज सकाळी केलात तर तुम्ही निरोगी आणि चांगलं आयुष्य जगू शकता. सकाळी उठल्यावर मॉर्निंग वॉक किंवा चालायला जाण हा खूपच सोपा व्यायाम वाटत असला तरी त्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. तेव्हा दिवसाची सुरुवात ही चालण्याने केल्यावर शरीराला मिळणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेऊयात.
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी सोपा उपाय : चालणे ही एक लो इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी असून फिटनेसच्या प्रत्येक लेव्हलसाठी अतिशय उत्तम आहे. हे हृदयाला आरोग्यदायी ठेवते आणि मसल्स सुद्धा स्ट्रॉंग करते, यामुळे हाडं सुद्धा मजबूत होतात. सकाळी चालण्याचा व्यायाम केल्याने हृदयाचे आजार, हाय बीपी आणि टाइप-2 डायबेटीजचा धोका कमी होतो. 2023 च्या एका रिपोर्टनुसार, जलद चालण्यामुळे डायबेटिजचा धोका 15 टक्क्यांनी कमी होतो.
एका अभ्यासातून असे समोर आले आहे की सकाळी एक तास चालल्याने ताणतणाव कमी होतो. निसर्गातील शांत आणि हिरव्यागार ठिकाणी चालल्याने शरीर रिलॅक्स होतं आणि यामुळे तुम्ही दिवसभर सकारात्मक राहता.
हेही वाचा : VIDEO : पाकिटबंद दूध पिण्यापूर्वी उकळावे की नाही? तज्ज्ञ काय सांगतात पाहा
चालणे हा कॅलरीज बर्न करण्याचा एक चांगला उपाय असून यामुळे तुमचे मेटाबॉलिज्म सुद्धा वेगाने होते. चालल्यानंतरही शरीर कॅलरीज बर्न करत ज्याला ‘आफ्टरबर्न इफेक्ट’ असं म्हणतात. हळूहळू दररोज चालण्याचा व्यायाम केल्यामुळे तुमचं वजन कमी करण्याचं ध्येय पूर्ण होऊ शकत.
चालण्याचा व्यायाम करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही या व्यायामाचा सहज तुमच्या दिनचर्येत समावेश करू शकता. यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज नसते.
सकाळी चालण्याचा व्यायाम केल्यामुळे झोपेचे चक्र आणि गुणवत्ता सुधारते. सकाळचा सूर्यप्रकाश मिळवल्यानंतर शरीराचे इंटरनल क्लॉक सेट होतं, ज्यामुळे रात्री चांगली झोप लागते. नियमित मॉर्निंग वॉक केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारू शकते ज्यामुळे दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी अधिक उत्साह वाढतो आणि ताजेतवाने वाटते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)