देशातील कोट्यवधी Aadhaar धारकांसाठी मोठी अपडेट, लक्ष द्या अन्यथा तुम्हाला बसेल नाहक भुर्दंड!

Free Aadhaar Update: आधार फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी आतापर्यंत UIDAI कडून 14 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.

Pravin Dabholkar | Updated: Dec 15, 2024, 02:35 PM IST
देशातील कोट्यवधी Aadhaar धारकांसाठी मोठी अपडेट,  लक्ष द्या अन्यथा तुम्हाला बसेल नाहक भुर्दंड! title=
आधार अपडेट

Free Aadhaar Update: आधार हा महत्वाचा सरकारी दस्तावेज आहे. शाळेच्या प्रवेशापासून ते नोकरी मिळण्यापर्यंत सगळीकडे आपल्याला आधार कार्डची मदत होते. पण अनेकदा आपल्याला आधार कार्डमध्ये फोटो, पत्ता, नावात बदल करण्याची गरज भासते. अशावेळी हा बदल कसा करायचा? यासाठी किती खर्च येतो? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. तुम्हीदेखील यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.  कारण UIDAI ने मोफत आधार अपडेटची मुदत पुन्हा वाढवली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

आधार फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी आतापर्यंत UIDAI कडून 14 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. पण आता यात आणखी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आधारमध्ये बदल करायचा असेल तर आता तो 14 जून 2025 पर्यंत करता येणार आहे. याचा अर्थ असा की तुमच्याजवळ आता 6 महिन्याचा कालावधी आहे. या कालावधीत जर तुम्ही आधार अपडेट केले तर तुमच्याकडून कोणते शुल्क आकारले जाणार नाही. 

दिलेल्या मुदतीनंतर आधार तपशील अपडेट करण्यासाठी काही अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. यात दिरंगाई केल्यास तुम्हाला खर्चात पडावे लागेल. आधार अपडेट मोफत सेवा फक्त myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे, याची तुम्हाला माहिती असायला हवी. 

UIDAI ने X वर पोस्टद्वारे दिली माहिती 

UIDAI द्वारे X वर याबद्दल एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.या पोस्टनुसार, 'UIDAI ने मोफत ऑनलाइन दस्तावेज अपलोड करण्याची सुविधा 14 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. यामुळे लाखो आधार क्रमांक धारकांना फायदा होऊ शकणार आहे. ही मोफत सेवा myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. UIDAI लोकांना त्यांचे आधार दस्तऐवज अपडेट ठेवण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI ने नागरिकांना त्यांच्या आधार कार्ड माहिती पुन्हा तपासण्यास सांगितले आहे. ज्यांना आधार कार्ड घेऊन 10 वर्षाहून अधिक काळ झालाय आणि त्यांनी आजपर्यंत कोणतेही अपडेट केलेले नाही, त्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण 10 वर्षात आधारमधील काही गोष्टी बदल्यावा लागू शकतात. आपल्या हे आता लक्षात येत नाही. पण कोणत्यातरी महत्वाच्या कामात आधार कार्ड देताना याचे महत्व कळते. असे असले तरी अशाप्रकारचे अपडेट अनिवार्य नाहीय. 

आधार हा एक विशिष्ट क्रमांक आहे. कोणत्याही रहिवाशांना एकापेक्षा जास्त आधार क्रमांक मिळू शकत नाही. कारण तो त्यांच्या वैयक्तिक बायोमेट्रिक्सशी जोडलेला असतो. आजकाल माहिती लिक होण्याचे प्रकार वाढले आहेत. अशावेळी बनावट ओळखीपासून बचाव करण्यासाठी आधार तुम्हाला मदत करते. आधार आधारित ओळखीद्वारे बनावट आणि डुप्लिकेट माहिती काढून टाकून टाकली जाते. यामुळे सरकारला इतर पात्र रहिवाशांना लाभ देण्यास मदत होते.

आधार नोंदणी आणि अपडेट नियमावली 2016 नुसार, 'आधार क्रमांक धारकाने त्याने मिळवलेल्या आधार क्रमांकाच्या निर्मितीच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी ओळख आणि पत्त्याचे प्रमाणपत्र अपडेट करावे. आपण तुमचा दस्तऐवज किंवा माहिती किमान एकदा अपडेट करण्याचा अधिकार तुम्हाला आहे.