Train Ticket Booking Trick: रेल्वेचा प्रवास म्हटलं की आधी तिकिट कन्फर्म होणार की नाही याचं टेन्शन येते. किंवा कधीकधी तिकिट काढल्यानंतरही वेटिंग तिकिट कन्फर्म होण्याची वाट पाहावी लागते. वेटिंग तिकिट असताना ट्रेनमध्ये किती सीट रिकाम्या आहेत हे तुम्ही आता IRCTCच्या अॅपच्या मदतीनेही पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला TTEची मदत घ्यावी लागणार नाही. IRCTC अॅपच्या मदतीने तुम्ही कोणत्याही चालत्या ट्रेनमध्ये असलेल्या रिकाम्या सीटची माहिती मिळवू शकता. अशावेळी तुम्हाला अचानक ट्रेन तिकिटांचे रिझर्व्हेशनची गरज भासेल तेव्हा तुम्हाला ट्रेनमध्ये किती सीट रिकाम्या आहेत याची माहिती मिळणार आहे.
IRCTC अॅपच्या माध्यमातून तुम्ही चालत्या ट्रेनमध्ये किती सीट रिकाम्या आहेत याची माहिती मिळवू शकता. व त्यानुसार ट्रेनचे तिकिट बुकिंग करु शकता. अचानक तुम्हाला कुठे जायचं असेल तर हे फिचर तुम्हाला फार उपयोगी पडणार आहे. या फिचरला Chart Vacancy असं नाव देण्यात आलं आहे. येथे तुम्ही ट्रेननंबर किंवा नाव टाकून किती आणि कोणत्या सीट रिकाम्या आहेत हे पाहू शकणार आहात.
- सगळ्यात पहिले तुम्ही IRCTC मोबाइल अॅप डाउनलोड करा
- आता होमस्क्रीनवर दिसणाऱ्या ट्रेन आयकॉनवर टॅप करा
- त्यानंतर Chart Vacancy नावाचा एक पर्याय मिळेल, त्यावर टॅप करा
- आता तुमचं नाव आणि त्या ट्रेनचा नंबर टाका, ज्यामुळं रिकाम्या सीटबद्दल माहिती मिळेल
- त्यानंतर ज्या स्टेशनवरुन तुम्हाला ट्रेन पकडायची आहे, तो निवडा
- आता ट्रेनमधील रिकाम्या सीटची माहिती स्क्रीनवर दिसेल.
- तुम्ही लॅपटॉप किंवा कंप्युटरवर IRCTCची अधिकृत वेबसाइट सुरू करा
- आता होमपेजवर Book Ticket बॉक्सच्या बाजूलाच असलेल्या Chart/Vacancy पर्याय दिसेल, यावर क्लिक करा
- स्क्रीनवर Reservation Chart सुरू होईल
- इथे गरजेची माहिती टाकल्यानंतर Get Train Chart पर्याय स्विकारा
- त्यानंतर ट्रेनमध्ये असलेल्या रिकाम्या सीटची माहिती तुम्हाला दिसणार आहे.