लग्नसराईचे दिवस येताच ग्राहकांना दिलासा; सोनं झालं स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे भाव

Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 4, 2024, 10:52 AM IST
लग्नसराईचे दिवस येताच ग्राहकांना दिलासा; सोनं झालं स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे भाव  title=
Gold Silver Price Today 4 November 2024 Gold And Silver Prices remain same check price

Gold Rate Today: दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर काहीसे स्थिरावले आहेत. रविवारी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर आज सोमवारी सोन्याचे दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेच. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 0.55 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळं MCXवर आज सोनं 78,434 रुपयांवर स्थिरावलं आहे. गेल्या 15 दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. तर, सराफा बाजारात आज सोन्याचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळतेय. 

सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 80,390 रुपयांवर पोहोचले आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 73,690 रुपयांवर पोहोचले आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर 60,290 रुपये प्रतितोळावर स्थिरावले आहे. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मौल्यवान धातुच्या मागणीनुसार दरांमध्ये चढ-उतार होताना दिसत आहे. दिवाळीत सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. मात्र आता दर स्थिरावताना दिसत आहेत. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  73,690 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  80,390 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  60,290 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,370 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8, 040 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6, 030 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   58,960 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   64,320रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    48,240 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट-  73,690 रुपये
24 कॅरेट- 80,390 रुपये
18 कॅरेट-  60,290 रुपये