टूथपेस्टवर अशी खूण असेल, तर सावध व्हा! त्याकडे कधीही दुर्लक्ष करु नका

बऱ्याच लोकांना या चिन्हाबद्दल माहिती नसते, ज्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करतात. परंतु तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे.

Updated: Jun 14, 2022, 08:47 PM IST
टूथपेस्टवर अशी खूण असेल, तर सावध व्हा! त्याकडे कधीही दुर्लक्ष करु नका title=

मुंबई : दात स्वच्छ करणे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. तसेच हे प्रत्येकाच्या दिनचर्याचा एक महत्वाचा भाग आहे. दात मजबूत ठेवण्यासाठी डॉक्टर दिवसातून दोन वेळेस दात घासण्यासाठी सांगतात. परंतु तुम्ही दात घासण्यासाठी महत्वाची असलेली टुथपेस्ट नीट पाहिली आहे का? बाजारात वेगवेगळ्या फ्लेवरची टूथपेस्ट मिळते. प्रत्येकजण आपापल्या चवीनुसार आणि आवडीनुसार ती खरेदी करतात. तसेच आपण टूथपेस्टमध्ये असलेले घटक पाहून ते विकते घेतो.

परंतु तुम्ही कधी पेस्टच्या ट्यूबच्या तळाशी नीट पाहिले आहे का? तेथे खाली असलेली खूण तुम्ही कधी नीट पाहिली आहे का? सर्व टूथपेस्टमध्ये शरीराच्या तळाशी एक चिन्ह असते. टूथपेस्ट खरेदी करण्यापूर्वी प्रत्येकाने हे चिन्ह पाहणे आवश्यक आहे.

बऱ्याच लोकांना या चिन्हाबद्दल माहिती नसते, ज्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करतात. या खुणा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ असतो, जो टूथपेस्टच्या हानिकारक गुणवत्तेबद्दल सांगतो.

Toothpaste Mark: टूथपेस्ट पर लगा है ऐसा मार्क तो हो जाएं सावधान, इग्नोर करना पड़ेगा भारी

काळा

टूथपेस्ट ट्यूबच्या तळाशी काळा डाग असल्यास चुकूनही हे खरेदी करू नका. या चिन्हाचा अर्थ पेस्टमध्ये सर्वाधिक प्रमाणात केमिकल आहे. याच्या वापरामुळे तुमच्या आरोग्याला मोठी हानी होऊ शकते.

लाल

काळ्या चिन्हापेक्षा, लाल रंगाचे चिन्ह असलेली टूथपेस्ट थोडी चांगली मानली जाते. यामध्ये नैसर्गिक गोष्टींसोबत रसायनांचाही वापर केला जातो. पण असे असले तरी या टुथपेस्ट टाळण्याचा प्रयत्न करा.

निळा

जर टूथपेस्ट ट्यूबच्या तळाशी निळ्या रंगाचे चिन्ह असेल तर ते मोठ्या प्रमाणात सुरक्षित मानले जाते. म्हणजे नैसर्गिक घटकांसोबतच टूथपेस्टमध्ये औषधांचाही वापर करण्यात आला आहे.

हिरवा

या रंगाची टूथपेस्ट दातांसाठी खूप चांगली मानली जाते. याचा अर्थ पेस्टमध्ये फक्त नैसर्गिक घटक वापरण्यात आले आहेत. हे दातांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे पेस्ट घेताना या रंगाच्या टूथपेस्टलाच प्राधान्य द्या