असा बॉस सगळ्यांना मिळो! कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून दिली 'रॉयल एनफील्ड', किंमत तब्बल...

Trending News In Marathi: चहाच्या बागेच्या मालकाने त्यांच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. मालकाने चक्क बाइक गिफ्ट केल्या आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 8, 2023, 01:02 PM IST
असा बॉस सगळ्यांना मिळो! कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून दिली 'रॉयल एनफील्ड', किंमत तब्बल... title=
Tamil Nadu Tea Estate Gifts Royal Enfield Bikes To Employees As Diwali Bonus

Trending News In Marathi:  दिवाळी ही आनंदाचा सण आहे. आता अवघ्या काहि दिवसांवर दिपावली येऊन ठेपली आहे. यावेळी अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणि बोनस दिला जातो. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दिवाळीचे गिफ्ट हा विषय देखील ट्रेडिंग आहे. अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना मिठाई किंवा ड्रायफ्रूड्स देतात. त्यामुळं सोशल मीडियावर अनेक मीमदेखील व्हायरल होतात. मात्र, काहि दिलदार कंपनीच्या मालकांनी त्याच्या कर्मचाऱ्यांना महागडे गिफ्ट देत खुश केलं आहे. तामिळनाडूतील एका चहाच्या बागेच्या मालकानं कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चक्क बुलेट दिली आहे. 

हरियाणातील एका फार्मा कंपनीच्या मालकाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून टाटा पंच कार भेट म्हणून दिली होती. त्यानंतर या मालकाचे खूप कौतुक करण्यात आलं होतं. त्याच्यापाठोपाठच तामिळनाडूतील या चहा बागेच्या मालकानंही त्याच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. त्यांना थेट रॉयल एनफिल्ड बुलेट भेट दिल्या आहेत. 

तामिळनाडूतील कोटागिरी येथे 190 एकरमध्ये पसरलेल्या चहा बागेचे मालक पी शिवकुमार यांनी दिवाळी भेट म्हणून कर्मचाऱ्यांना तब्बल दोन लाखांची रॉयल एनफिल्ट बुलेट भेट दिली आहे. यासाठी त्यांनी कंपनीत काम करणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांची निवड केली होती. तर, उर्वरित कर्मचाऱ्यांनाही विशेष भेटवस्तूंचे वाटप केले आहे. गेल्या दोन दशकांपासून त्याच्या चहाच्या मळ्यात 627 कर्मचारी काम करतात. यंदा त्यांनी त्याच्या बागेत काम करणाऱ्या मॅनेजर, सुपरवायझर,स्टोअरकिपर,कॅशियर, फिल्ड स्टाफ आणि ड्रायव्हरसह अन्य 15 कर्मचाऱ्यांना बुलेटचं गिफ्ट दिलं आहे. 

मालकाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना बुलेटच्या चाव्या सोपवल्यानंतर त्यांच्यासोबत एक फेरफटका देखील मारायला गेले होते. एक कर्माचाऱ्याने म्हटलं आहे की, मालकांनी त्यांच्या पसंतीच्या जवळपास 15 रॉयल एनफिल्ट बुलेट कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता. आमच्या कामाचं फळ अशारितीने मिळेल याची आम्हाला कल्पना नव्हती. 

दरम्यान, हरियाणातील पंचकुला येथील एका फार्मा कंपनीच्या मालकाने 12 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट केली आहे. दिवाळी 38 जणांना त्याचं काम आणि इमानदारीसाठी कार देऊन त्यांचं कौतुक केलं आहे. मिट्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिलेल्या एका  विधानानुसार, कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार देण्यात आल्या आहेत. कंपनीचे संचालक एम के भाटिया यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सेलेब्रिटी म्हणून उल्लेख करत सगळ्यात छान काम करणाऱ्या 12 कर्मचाऱ्यांना कार भेट दिली आहे. आणि येत्याकाळात अन्य 38 जणांनाही कार भेट म्हणून देण्यात येणार आहे.