Shraddha Walker Case : 'फाशी झाली तरी बेहत्तर...', पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताब असं का म्हणाला?

समोर आला आफताबचा खरा चेहरा; केलेल्या गुन्ह्याची नराधमाला खंत नाही. म्हणतोय, 'फाशी झाली तरी हरकत नाही, स्वर्गात मिळेल...'  

Updated: Nov 29, 2022, 12:05 PM IST
Shraddha Walker Case : 'फाशी झाली तरी बेहत्तर...', पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताब असं का म्हणाला? title=

Shraddha Walker Case : श्रद्धाचे 35 तुकडे करून आफताबने तिच्या प्रेमाचा अंत केला. एवढंच नाहीतर आफताबने पोलिसांसमोर त्याचा गुन्हा कबूल देखील केला आहे. श्रद्धा हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावाला (Aaftab Poonawala) याला कोर्टाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली असून त्याची रवानगी तिहार जेलमध्ये (Tihar Jail) करण्यात आली आहे. आफताबची पॉलिग्राफ टेस्ट केल्यानंतर धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. (shraddha walker age)
 

पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताबची मानसिकता आली समोर

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'आफताह म्हणाला श्रद्धाच्या हत्या प्रकरणात फाशी झाली तरी हरकत नाही. स्वर्गात गेल्यानंतर मला आणखी अप्सरा भेटतील.' एवढंच नाहीतर, जेव्हा आफताब श्रद्धासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होता, तेव्हा त्याचं 20 पेक्षा अधिक हिंदू मुलींसोबत प्रेमसंबंध असल्याचं देखील त्याने कबूल केलं आहे. (shraddha walker family)

आफताब बंबल ऍपच्या माध्यमातून हिंदू मुलींना फसवत होता. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताह मानसशास्त्रज्ञ महिलेला त्याच्या घरी घेवून आला होता. तेव्हा त्याने त्या महिलेल्या श्रद्धाची अंगठी देवून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. श्रद्धा आणि मानसशास्त्रज्ञ महिले शिवाय आफताबच्या आयुष्यात हिंदू अनेक महिला होत्या. 

श्रद्धाची हत्या केल्यानंतर काय म्हणाला आफताब
श्रद्धाची हत्या (shraddha walker story) करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही... असं देखील आफताब चौकशी दरम्यान म्हणाला. आफताच्या या गुन्ह्यानंतर संपूर्ण देशात वातावरण तापलं आहे. आफताबला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे आफताबला त्याने केलेल्या गुन्ह्याची कोणतीही खंत नाही. तुरुंगात देखील तो टेन्शन फ्री आयुष्य जगत आहे. (shraddha walkar news latest)

वाचा | 'आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले, आम्ही त्याचे 70 तुकडे करु' आफताबवर हल्ला करण्यासाठी तलवार घेऊन होते सज्ज

दरम्यान, अद्यापही श्रद्धा हत्या प्रकरणात आफताबची कसून चौकशी सुरु आहे. पण आफताब पोलिसांना उटल सुलट उत्तर देत असल्याचं दिसून आलं आहे. आता त्याची रवानगी तिहार जेलमध्ये करण्यात आली आहे. (shraddha walker latest news) पण जेलमध्येही त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे किंवा तणावाचे कोणतेच भाव दिसून आले नाहीत.