Aftab Tihar Jail: श्रद्धा हत्याकांडातील (Shraddha Murder Case)आरोपी आफताब (Aftab) याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Crime News) आफताबची पहिली रात्र दिल्लीच्या तिहार तुरुंगात तणावात गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब याला जेल क्रमांक 4 मधील त्याच्या सेलमध्ये आणण्यात आले, तोपर्यंत तो सामान्य होता. सहकारी कैदी त्याच्याशी बोलू लागले तेव्हा तो फक्त इंग्रजीत बोलत होता. मात्र, नंतर जेल वॉर्डनने आफताब याला अन्य कैद्यांपासून दूर राहण्यास सांगितले, त्यानंतर तो तणावाखाली दिसत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आफताब याने तिहार जेलच्या नियमावलीनुसार साधे जेवण खाल्ले. आफताब रात्रभर घोंगडी पांघरुन शांत झोपला. यादरम्यान त्याच्यावर सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण वेळ नजर ठेवण्यात आली होती.
विशेष म्हणजे सोमवारी आफताबची नार्को चाचणी होऊ शकते. श्रद्धा हत्याकांडातील संपूर्ण सत्य नार्को टेस्टमध्ये बाहेर येण्याची अपेक्षा आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यापूर्वी तो पोलीस कोठडीत होता. (अधिक वाचा - मधाचं पोळ काढणे बेतलं जीवावर, विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू)
श्रद्धा खून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे. पोलिसांनी दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात या प्रकरणाचा तपास केला. आफताबलाही छतरपूर येथील त्याच्या घरी नेण्यात आले जेथे त्याने श्रद्धाची निर्घृण हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे केले.
आरोपानुसार, आफताबने आधी श्रद्धाची हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. मृतदेहाचे हे तुकडे त्यांनी घरातील फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यासाठी त्यांने नवीन फ्रीज घेतला होता. त्यानंतर त्याने मृतदेहाचे हे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वसईच्या श्रद्धा वालकर (27) हिची तिचा प्रियकर आफताब याने दिल्लीमध्ये निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 14 नोव्हेंबरला उघड झाली होती. या घटनेनंतर दिल्लीसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर डिसेंबर 2020 पासून श्रद्धाला आफताब मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, असा दावा तिच्या मित्र-मैत्रिणींनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास त्या दिशेने पोलिसांनी सुरु केल्याचे सांगितले जात आहे.