गरिबीला कंटाळले...ठेकेदाराचे संपुर्ण कुटूंबियासह विष प्राशन

Shocking Story : व्यवसायाने कंत्राटदार असलेले 40 वर्षीय किशोर जाटव हे शहरातील खजुरी परिसरात कुटुंबा सोबत राहतात. गेल्या काही महिन्यांपासून ते आर्थिक अडचणींचा (Poverty)सामना करत होते. त्यामुळे ते खुप तणावात होते. 

Updated: Jan 12, 2023, 09:28 PM IST
गरिबीला कंटाळले...ठेकेदाराचे संपुर्ण कुटूंबियासह विष प्राशन title=

Shocking Story : देशभरात दररोज आत्महत्येच्या घटना घडत असतात.मात्र या घटनेने संपुर्ण देशाला हादरा दिला आहे. कारण या घटनेत एका ठेकेदाराने संपुर्ण कुटुंबाला विष पाजून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर कुटूंबातील इतर सदस्यावर रूग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. आता यामधील किती लोक या घटनेतून वाचतात हे पाहावे लागणार आहे. या घटनेने परीसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

गरिबीला कंटाळले 

या घटनेत व्यवसायाने कंत्राटदार असलेले 40 वर्षीय किशोर जाटव हे शहरातील खजुरी परिसरात कुटुंबा सोबत राहतात. गेल्या काही महिन्यांपासून ते आर्थिक अडचणींचा (Poverty)सामना करत होते. त्यामुळे ते खुप तणावात होते. या समस्येतून सुटका करून घेण्याचा त्यांच्याजवळ कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून त्याने मृत्यूला कवटाळणे योग्य समजले आणि ठेकेदाराने संपूर्ण कुटुंबासह विष प्राशन केले होते.

बुधवारी ठेकेदार किशोर आणि त्याची 35 वर्षीय पत्नी सीता यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर आई-वडिलांनी कांचन (15), पूर्वा (8), अन्नू (10) आणि अभय (12) या चार मुलांना दुधातून विष (milk poison)देऊन त्यांनाही आत्महत्या करायला भाग पाडले.अशाप्रकारे संपुर्ण कुटूंबियांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या कुटूंबियाने गरीबीला कंटाळून आत्महत्या केली होती.

या घटनेची माहीती स्थानिकांना मिळताच त्यांनी कुटूंबातील सर्व संदस्यांना रूग्णालयात दाखल केले होते. यामध्ये विषयुक्त दूध प्यायल्याने पूर्वा हिचा आज सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर तिच्या भावंडांची प्रकृती चिंताजनक आहे. तर तिचे आई-वडिल ही धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणात मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh)भोपाळमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच हळहळ देखील व्यक्त होतेय.