नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतच चाललेत. दरम्यान, बुधवारी तेल कंपन्यांनी या दरात छोटीशी कपात केली. मात्र यामुळे सामन्यांना काही फारसा दिलासा मिळालेला नाहीये. आता अशी बातमी येतेय की मोदी सरकारकडे अशी ऑफर आहे ज्यामुळे पेट्रोल २३ रुपये ३५ पैसे आणि डिझेल २१ रुपयांनी स्वस्त होऊ शकते. जगातील सर्वात मोठी क्रूड ऑईल भांडार असलेला देश व्हेनेझुएलाने भारताला ही ऑफर दिलीये. जर भारत सरकारने व्हेनेझुएलाची ही ऑफर स्वीकारली तर देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीला ब्रेक लागू शकतो. अखेर याबाबतचा अंतिम निर्णय PMOला घ्यायचा आहे.
जगातील सर्वात मोठे क्रूड ऑईलचे भांडार असलेला देश व्हेनेझुएलाने म्हटलेय की भारताने क्रूड आयातीसाठी जर त्यांची करन्सी पेट्रोचा वापर केला तर ते आपल्याला ३० टक्क्यांनी स्वस्त पेट्रोल देण्यास तयार आहेत. व्हेनेझुएलाने नुकतंच न्यू ब्लॉकटेन टेक्नॉलॉजीवर आधारित करन्सी पेट्रो लाँच केली. भारताने व्हेनेझुएलाची ही ऑफर स्वीकारल्यास आपल्याला मोठा फायदा होऊ शकतो.
भारत तब्बल ८० टक्के क्रूड ऑईल आयात करतो. यातच भारताला अधिकाधिक क्रूड ऑईलची आयात व्हेनेझुएलाकडून झाली तर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात होऊ शकते.यामुळे केवळ पेट्रोल-डिझेलचेच दर कमी होणार नाही तर महागाईही कमी होईल.
पेट्रो जगात कोणत्याही देशाने समर्थ दिलेली पहिली क्रिप्टोकरन्सी आहे. याचे नावही पेट्रोलियमवरुन घेण्यात आलेय. कारण या देशात क्रूड ऑईलचे मोठे भांडार आहे तसचे यांची इकॉनॉमी यावर अवलंबून आहे. व्हेनेझुएलामध्ये ३०० अब्ज बॅरेल इतका जगातील सर्वात मोठा क्रूड ऑईल रिझर्व्ह आहे.