मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो व्हायरल होत असतात. यामध्ये काही फोटो स्टार्सचे असतात, तर काही फोटो ऑप्टीकल इल्युजनचे (optical illusion) असतात. आता असाच एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो ऑप्टीकल इल्युजनचा (personality optical illusion) आहे. या फोटोतली तारखेवरून तुम्हाला सिनेमा ओळखायचा. तुम्हाला हा सिनेमा ओळखता येतोय का पाहा.
फोटोत काय?
सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत सिमेंटच्या भिंतीवर तारीख लिहली गेली आहे. ही तारीख 5 सप्टेंबर आहे. या ताऱखेवरून आणि आजूबाजूच्या चित्रावरून तुम्हाला या सिनेमाचं नाव ओळखायचं आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर बनलेला हा एक प्रसिद्ध चित्रपट होता. तुम्हाला या सिनेमाच नाव ओळखता आलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.
आमिर खान, शर्मन जोशी, आर.माधवन आणि करीना कपूर साऱख्या स्टार कलाकारांनी भरलेला हा सिनेमा आहे. या सिनेमाचे नाव 3 इडियट्स आहे. हा चित्रपट बॉलिवूडमध्ये खुप गाजला होता. चित्रपटापासून डायलॉगची खुप चर्चा होती.
या चित्रपटात आमिर खान (रेंचो), शर्मन जोशी (राजू) आणि आर.माधवन (फरहान) च्या भूमिकेत होते. या सिनेमातल्या एका सीनवरून तुम्हाला ही ताऱीख आठवणार आहे. ज्यावेळेस कॉलेजच्या कार्यक्रमात हुशार विद्यार्थी ओमी वैद्य (चतूर, सायलेन्सर) याला प्रमुख पाहूण्यांसाठी भाषण देण्यास सांगितले जाते. त्यावेळेस रेंचो आणि फरहान त्याचे संपुर्ण भाषण बदलून अश्लील शब्द असलेले भाषण देतो. आणि हे संपुर्ण भाषण चतूर कॉलेजच्या कार्यक्रमात बोलतो. या भाषणानंतर त्यांची चांगलीच नाचक्की होते.
दरम्यान या सीननंतर चतूर दारू पिऊन कॉलेजच्या टॅरेसवर येतो आणि रेंचो आणि फरहानला याचा जाब विचारतो. त्यावेळेस त्याला रंटा मारून कोणीही पुढे जात नसल्याचे उदाहरण देतो. मात्र त्याला न जुमानत चतूर '10 साल के बाद इसी जगह वापस मिलेंगे' असा डायलॉग मारत, भिंतीवर 5 संप्टेबर ही ताऱीख लिहतो. आणि रेंचोला म्हणतो, 'ये डेट भूलना मत', आणि तिथून तो निघून जातो. या सीननंतर ती तारीख प्रसिद्ध झाली होती. आता तर तुम्हाला कळालचं असेल या सिनेमाचं नाव.