NHAI Job: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती, परीक्षा द्यायची गरज नाही;2 लाखांपर्यंत पगार

NHAI Recruitment 2024:  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 2 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 31, 2024, 01:11 PM IST
NHAI Job: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती, परीक्षा द्यायची गरज नाही;2 लाखांपर्यंत पगार title=
राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत बंपर भरती

NHAI Recruitment 2024: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षा देण्याची गरज नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 2 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे. 

चांगल्या पगाराची सरकारी नोकरी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकाही रिक्त पदे भरण्यासाठी जाहीरात देण्यात आली आहेत. या भरतीद्वारे महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक आणि व्यवस्थापक या पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना NHAI ची अधिकृत वेबसाइट nhai.gov.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे. अनेक जणांना लेखी परीक्षेची भीती वाटते. त्यांच्यासाठी चांगली बाब म्हणजे या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. जर तुमची NHAI च्या या पदांसाठी निवड झाली असेल आणि तुम्हाला चांगला पगार देखील मिळेल. महत्त्वाचा तपशील जाणून घेऊया. 

रिक्त जागांचा तपशील

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या या भरतीद्वारे एकूण 60 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये महाव्यवस्थापक (तांत्रिक) च्या 20 जागा, उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक) च्या 20 जागा आणि व्यवस्थापक (तांत्रिक) च्या 20 जागा भरल्या जाणार आहेत. 

वयोमर्यादा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदांनुसार पात्रता आणि कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. याचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. 

किती मिळेल पगार?

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या भरती अंतर्गत, महाव्यवस्थापक (तांत्रिक) पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना स्तर-13 नुसार पगार दिला जाणार आहे.  हा पगार 1 लाख 23 हजार 100 ते 2 लाख 15 हजार 900 पर्यत असेल.उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक) पदासाठी निवड झालेल्यांना स्तर-12 नुसार पगार दिला जाईल. 78 हजार 800 ते 2 लाख 09 हजार 200 पगार दिला जाईल. व्यवस्थापक (तांत्रिक) या पदासाठी स्तर-11 नुसार पगार दिला जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 67 हजार 700 ते 2 लाख 8 हजार 700 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

अर्ज प्रक्रिया 

NHAI भर्ती 2024 च्या नोटिफिकेशननुसार, उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट 'डीजीएस (एचआर/अॅडमिन)-3, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भारत सरकार, प्लॉट नंबर जी 5, 6, सेक्टर-10, द्वारका, नवी दिल्ली-110075' या पत्त्यावर पाठवावी लागणार आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

NHAI च्या या रिक्त जागेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 22 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा