Prayagraj Viral Video: महाकुंभ हे केवळ श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र नाही तर अनेक लोकांसाठी पैसे कमविण्याची एक उत्तम संधी देखील आहे. अलीकडेच, अशीच एक बिझनेसची आयडिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक मोबाईल चार्जिंग स्टॉल लावून चांगले पैसे कमवत आहेत.
महाकुंभात करोडो भाविक येतात, ज्यांचे मोबाईल फोन लवकर डिस्चार्ज होतात. काही लोकांनी या संधीचा चांगलाच फायदा घेतला आहे. घाट आणि मंडपाजवळ मोबाईल चार्जिंगचे स्टॉल लावतात. प्रत्येक चार्जिंगसाठी 20-50 रुपये शुल्क आकारले जात आहे. लोक त्यांचे फोन चार्ज करण्यासाठी ही रक्कम देण्यास सहज तयार असतात. दिवसभर शेकडो लोक त्यांचे फोन चार्ज करतात, ज्यामुळे एका तासात 1000 रुपयांपर्यंत कमाई होते. महाकुंभात ही अनोखी व्यवसाय कल्पना बरीच लोकप्रिय झाली आहे.
लाखो भाविक दूरदूरहून कुंभमेळ्याला येतात आणि तासन् तास भटकंती करताना त्यांच्या फोनची बॅटरी संपते. अशा ठिकाणी चार्जिंग पॉइंट्सची कमतरता आहे. ज्यामुळे लोकांना त्रास होतो. काही लोकांनी या गरजेला पैसे कमविण्याच्या संधी म्हणून पाहिलं आहे. घाट आणि मंडपाजवळ मोबाईल चार्जिंगचे स्टॉल उभारण्यात आले आहेत, जिथे प्रत्येक चार्जिंगसाठी 20 ते 50 रुपये शुल्क आकारले जात आहे. यामुळे भाविकांना दिलासा मिळत आहे आणि व्यावसायिकांनाही चांगले उत्पन्न मिळत आहे. एका तासात 1000 रुपयांपर्यंत कमाई होत आहे, त्यामुळे ही कल्पना खूप यशस्वी ठरत आहे.
शुभम सिंह नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ दहा लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर, अनेकांना ते आवडले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स विविध कमेंट करत आहेत. "भाऊ, पैसे कमवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे." दुसऱ्या युझरने लिहिले, व्वा! गरजेला व्यवसायात रूपांतरित करण्याचे हे खरे उदाहरण आहे. महाकुंभात अशी सेवा खरोखर फायदेशीर ठरू शकते." दुसऱ्या युझरने लिहिले, "हुशार विचारसरणी! जेव्हा प्रत्येकजण चार्जिंग शोधत असेल तेव्हा हा व्यवसाय भरभराटीला येईल. ' मी हा आधीच विचार केला असता." दुसऱ्या युझरने लिहिले, "छान कल्पना! यामुळे लोकांच्या समस्या सुटत नाहीत तर रोजगाराचा एक चांगला स्रोत देखील बनला आहे.