Mahakumbh 2025: महाकुंभनंतर नागा साधू नेमके कुठे जातात? नागा बाबाने सगळं रहस्य उलगडलं, 'आम्ही सगळे....'

Mahakumbh 2025: निरंजनी आखाड्याचे नागा बाबा दिगंबर दर्शन गिरीजी महाराज यांनी सांगितलं की, "शिवरात्री आणि होळी नागांच्या काशीत होते. तिथे महादेवाचा अभिषेक करुन आखाड्यात येतात. होळी खेळल्यानंतर तिथून हरिद्वारसाठी निघतात. नागा संन्यासी संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी थांबतात".  

शिवराज यादव | Updated: Feb 4, 2025, 05:47 PM IST
Mahakumbh 2025: महाकुंभनंतर नागा साधू नेमके कुठे जातात? नागा बाबाने सगळं रहस्य उलगडलं, 'आम्ही सगळे....' title=

Mahakumbh 2025: महाकुंभमध्ये तीन अमृत स्नान पूर्ण झाले आहेत आणि आता आखाडे रिकामे होण्यास सुरुवात झाली आहे. महाकुंभमधील सर्वात मोठं आकर्षक पुन्हा एकदा नागा साधूच होते. अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, हजारो-लाखोंच्या संख्येने येणारे नागा साधू अमृत स्नानंतर कुठे गायब होतात? निरंजनी आखाड्याचे नागा बाबा दिगंबर दर्शन गिरी जी महाराज यांनी 'आज तक'शी संवाद साधताना याचा खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी नागा साधू नेमके कुठे जातात? आणि काय करतात? हे सांगितलं आहे. 

दिगंबर दर्शन गिरी जी महाराजांनी सांगितलं की, तीन अमृत स्नान झाले आहेत आणि उद्याचे एक स्नान बाकी आहे, गुरु बंधू त्रिवेणीत होणाऱ्या वेगळ्या स्नानासाठी जातात जे त्रिवेणीत पार पडतं. त्यानंतर छावणीत परत येतात. त्यानंतर पंच परमेश्वराची प्रक्रिया 7 तारखेपर्यंत चालू राहते.  नवीन पंच निवडला जातो आणि ७ तारखेला पूजा-हवन केल्यानंतर आम्ही काशीकडे निघतो.

काशीत साजरी केली जाते होळी आणि महाशिवरात्री

काशीमध्ये आमचे स्थायी आखाडे आहेत तिथे महाशिवरात्री मेला आणि मसान होळी साजरी करुन आम्ही आमच्या ठिकाणांसाठी निघतो. त्यांनी सांगितले, 'शिवरात्री आणि होळी फक्त नागांच्या काशीमध्येच साजरी केली जाते. तिथे महादेवाला अभिषेक केल्यानंतर ते आखाड्यात येतात. होळी खेळल्यानंतर, आम्ही तिथून हरिद्वारला निघतो. नागा साधू भारताच्या विविध ठिकाणी राहतात. देशाच्या वेगवेगळ्या भागात काही साधू त्यांच्या गुरूंच्या आखाड्यात सेवा करतात. काही जण हिमालय, केदारनाथ, बद्रीनाथ, हिमाचल, जम्मू-काश्मीर, नर्मदखंड येथे जातात, तर काही जण नेपाळला जातात, जिथे त्यांचे कायमचे निवासस्थान आहे. जिथे जिथे लोकांना आसक्ती असते तिथे ते जातात, म्हणजेच ते चारही दिशांना पसरतात. ,

धर्माची रक्षा करणं हाच आमचा हेतू - दिगंबर दर्शन गिरी जी महाराज

नागा साधूंना सर्वात शक्तिशाली म्हटले जाते. नागा साधूंमध्ये असं काय आहे जे लोकांना माहित नाही? यावर उत्तर देताना दिगंबर दर्शन गिरी जी महाराज म्हणाले, 'प्राचीन काळात इंग्रज आणि मुघल राज्य करत होते. या राजांच्या कारकिर्दीत, जेव्हा जेव्हा धर्मावर हल्ला झाला, तेव्हा नागा भिक्षूंनी लढा दिला, आपले प्राण अर्पण केले आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी नागा साधू बनले. भाला, त्रिशूळ, धनुष्य, गदा आणि तलवार वापरण्याची चाचणी घेण्यात आली. धर्माच्या रक्षणासाठी मरणे हा त्यांचा धर्म आहे. मी 1.25 लाख रुद्राक्ष धारण केले आहेत, हा भगवान शिवाचा आशीर्वाद आहे.