'कर्नाटकात आमदारांसाठी घोडेबाजार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेखील सहभागी'

कर्नाटकात जेडीएस आणि काँग्रेस सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. कुमारस्वामी यांनी घोडेबाजारात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा हात असल्याचे विधान केले आहे.

Updated: Feb 8, 2019, 09:24 PM IST
'कर्नाटकात आमदारांसाठी घोडेबाजार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेखील सहभागी' title=

बंगळुरु :  कर्नाटकात जेडीएस आणि काँग्रेस सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजपने फोडाफोडीचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, भाजप पैशाच्या जोरावर सर्व राजकारण करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला आहे. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्या विधानावरून या घोडेबाजारात महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेखील सहाभागी आहेत, हे दिसून येत आहे. कुमारस्वामी यांनी घोडेबाजारात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचे विधान केले आहे.

दरम्यान, कर्नाटकातील जेडीएस आमदार नारायण गौडा यांनी आपण मुंबईतल्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. नारायण गौडा भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा होती. भाजप आमदार श्रीरामलू यांनी यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यावर एक व्हिडिओ प्रसारित करून आपण उपचारांसाठी मुंबईत असल्याचे नारायण गौडा यांनी व्हिडिओद्वारे स्पष्ट केले. 

कर्नाटकात राजकीय संघर्ष सुरूच आहे. काल सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला होता. मात्र तरी देखील काँग्रेसचे नऊ बंडखोर आमदार अनुपस्थितच राहिले. तर दुसरीकडे काँग्रेसनंतर आता जेडीएसचा एक आमदार भाजपच्या गळाला लागल्याची शक्यता आहे. जेडीएसचे आमदार नारायण गौडा हे भाजपच्या संपर्कात असून ते मुंबईला रवाना झाले. भाजप आमदार श्रीरामलू यांनी ही माहिती दिली होती. मात्र, आपण उपचारासाठी मुंबईत असल्याचे सांगत गौडा यांनी यावर पडदा टाकण्याचे काम केले.  
 
११.३० वाजता मला फोन आला येडीयुराप्पा बोलणार आहेत म्हणून. त्यामध्ये येडीयुराप्पा भेटण्यासाठी बोलविले. मग मी देवदुर्गला गेलो. तिथे गेल्यानंतर येडीयुराप्पा यांनी मला कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवले. पैश्याचा विचार करू नकोस मुंबईला माझे चिरंजीव विजेयांद्रा आहेत तिथे ते सगळी व्यवस्था करतील, असं मला यडीयुराप्पा बोलले, अशी माहिती शरणगोंडा यांनी दिली. घोडेबाजार करण्यासाठी इतका पैसा भाजप नेत्याकडे कसा आला ? भाजप आपल्या फंडातून इतका पैसे देणार आहेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे संभाषण पाठविणार, अशी माहिती मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिली. त्याचवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याही यात आहे, असा थेट आरोप कुमारस्वामी यांनी केला.

कर्नाटकात राजकीय संघर्ष सुरूच, काँग्रेसचे नऊ आमदार गैरहजर

तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये राजकीय वादळ घोंघाऊ लागले आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी आतापर्यंत बजेट सत्रात सहभाग घेतला नाही. पक्षाकडून त्यांना व्हीप जारी करण्यात आला होता. मात्र, हा व्हीप डावल्याने त्यांच्यावर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगरला आहे. रमेश जरकीहोली, उमेश जाधव, महेश कुमथली, बी नागेंद्र आणि जेएन गणेश हे बैठकीला उपस्थित नव्हते. काँग्रेसने अशा बंडखोर आमदारांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.