बायकोसाठी बाईकवर लिहला खास मेसेज, अख्ख गाव आता त्याच्यावर हसतंय

नवऱ्याने आपल्या पत्नीसाठी केलेल्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या अथवा पाहिल्या असतीलचं. 

Updated: Jun 1, 2022, 08:50 PM IST
बायकोसाठी बाईकवर लिहला खास मेसेज, अख्ख गाव आता त्याच्यावर हसतंय title=

मुंबई : नवऱ्याने आपल्या पत्नीसाठी केलेल्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या अथवा पाहिल्या असतीलचं. काहींनी आपल्या बायकोला मोठ गिफ्ट दिलं तर काहींनी तिच्यासाठी स्वत:च्या हाताने जेवण बनवलं. मात्र या घटनेत काही वेगळचं घडलंय. नवऱ्याने आपल्या पत्नीसाठी बाईकवर खास मेसेज लिहीलाय. या मेसेजवरून आता संपूर्ण गाव त्याच्यावर हसतेय.  या संबंधित व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत, पत्नी आपल्या नवऱ्यासोबत बाईकवर बसलेली आहे. या बाईकच्या हेडलाईटवर पत्नीने एक खास मेसेज लिहला आहे. 'बिवी से बहस, जिंदगी तहस नहस' म्हणजेच बायकोशी वाद घालाल तर उद्ध्वस्त व्हाल असा या मेसेजमधून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. 

दरम्यान नवऱ्याने लिहलेल्या या खास मेसेजची गावात खुप चर्चा आहे. संपुर्ण गाव त्याच्या या मेसेजवर हसतेय. तर अनेकांनी पुरुषांनी त्याच्या या मेसेजला खरय असा रिप्लाय दिला आहे. तर बायकांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे.