पतीच्या मित्रासोबतच जुळलं सूत... मग पतीला संपवण्यासाठी पत्नीने जे केलं ते वाचून बसेल धक्का

छुप्या कॅमेऱ्यामुळे 'ते' प्रसंग समोर, इथे थरारपटाची Story पण पडेल फिकी ....  

Updated: Aug 9, 2022, 03:43 PM IST
पतीच्या मित्रासोबतच जुळलं सूत... मग पतीला संपवण्यासाठी पत्नीने जे केलं ते वाचून बसेल धक्का

Crime News : अनैतिक संबंधांमुळे सात जन्म साथ देण्याची शपथ घेतलेल्या पती नात्याला काळीमा फासणारं एक प्रकरण समोर आलं आहे. आधी सर्वांना अपघात वाटलेल्या या प्रकरणामध्ये पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं.

नेमकं काय आहे प्रकरण?
मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या बिल्डर शैलेश प्रजापती यांना बोलेरो गाडीने मागून धडक दिली जाते त्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो. शैलेशचे सासरे अपघाती मृत्यू म्हणून FIR दाखल करतात. त्यांच्या कुटूंबियांना हा अपघात असल्याचं वाटतं. मात्र, या अपघाताचं सीसीटीव्ही (CCTV Footage) फुटेज समोर येतं. ते पाहून हा अपघात संशयास्पद असल्याचा संशय पोलिसांनाही येतो.

क्राईम ब्रांचला एक अज्ञात व्यक्ती फोन करत सांगते, की बिल्डर शैलेश प्रजापती यांचा अपघात नसून एक षडयंत्र आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे हे षडयंत्र असल्याचा पोलिसांचा संशय विश्वासात बदलतो. त्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

पोलिसांनी असा लावला छडा...

शैलेश यांच्या पत्नीची चौकशी करताना, पोलिसांनी शैलेश यांचा खून झाला असं वाटतं का?, असा प्रश्न विचारला, तेव्हा त्या पोलिसांना व्यवस्थित उत्तर देऊ शकल्या नाहीत. त्यानंतर पोलीस शैलेश यांच्या पत्नीचे आणि बोलेरो चालकाचे फोन डिटेल्स तपासून पाहतात त्यावेळी या दोघांचं नितीन नावाच्या व्यक्तिशी प्रजापती यांच्या पत्नी आणि बोलेरो चालकाचं बोलणं झाल्याचं समजतं.

नितीन कोण ?
नितीन आणि शैलेश रिअल इस्टेट व्यवसायात एकत्र काम करायचे. नितीनचं त्यांच्या घरी येणं जाणं कायम असायचं. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून तो घरी येत नव्हता. पोलिसांनी चौकशी केल्यावर नितीन आणि शैलेशची पत्नी स्वाती दोघांचे अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं.

...आणि पुढे
शैलेश यांना ही गोष्ट समजली. त्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये एक छुपा कॅमेरा लावला. त्यामध्ये नितीन आणि स्वाती यांचे अनैतिक संबंध असल्याचं उघड झालं. मात्र या गोष्टीमुळे व्यवसायामध्ये मोठं नुकसान होईल म्हणून स्वातीने निलेशसोबत बोलणं सोडून दिलं होतं.

असा रचला कट
शैलेश यांना पत्नीच्या अनैतिक संबंधांविषयी कळताच डाव विस्कटला होता. स्वाती आणि निलेशला मात्र त्यांचे अनैतिक संबंध कायम ठेवायचे होते. त्यामुळे शैलेश यांना संपवण्याचं मोठं पाऊल त्या दोघांनीही उचललं. 10 लाख रुपये देत त्या दोघांनी शैलेशला मारण्याची सुपारी थेट गुंडांकडेच दिली. शैलेश मॉर्निंग वॉकला जायचे हे पाहत त्यांच्या याच सवयीचा फायदा घेत बोलेरो गाडीने धडक देत शैलेश यांना आपल्या वाटेतून बाजुला हटवलं.

दरम्यान, ही घटना गुजरातमधील 'वस्त्राल' या शहरातील असून अहमदाबाद क्राईम ब्रांचने स्वाती आणि निलेश यांना ताब्यात घेतलं आहे.