सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, काय आहेत आजचे 24 कॅरेटचे भाव, जाणून घ्या!

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घेऊयात.

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 20, 2025, 11:45 AM IST
सोन्याच्या दराने गाठला उच्चांक, काय आहेत आजचे 24 कॅरेटचे भाव, जाणून घ्या!
Gold Rate Today 20 feb latest update on mcx silver price high in india check rates

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गंत बाजारात पुन्हा एकदा सोन्याचे दर महागले आहेत. वायदे बाजारात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. गुरुवारी MCX वर सोनं 88,040 रुपयांवर पोहोचलं आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर $25 ने उसळलं आहे. कॉमेक्स सोनं $ 2,960 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचे भावदेखील वाढले आहेत आज चांदी 97,000 रुपयांवर पोहोचली आहे. 

आज 24 कॅरेट सोन्याचे दर 390 रुपयांनी वाढले असून प्रतितोळा सोनं 88,040 रुपयांवर पोहोचलं आहे. 22 कॅरेट सोन्याचे दर 350 रुपयांनी वाढलं असून 80,700 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 290 रुपयांनी वाढून 66,030 रुपयांवर पोहोचलं आहे. आज सोन्याचे दर पुन्हा वाढल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आणि सुरक्षित-आश्रय मागणी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन कर आकारणीच्या धमक्यांमुळे सतत खरेदीमुळे बुधवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. बुधवारी चांदीचा भावही ६०० रुपयांनी वाढून ९९,६०० रुपये प्रति किलो झाला होता. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  80,700 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 88,040 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  66,030 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   8,070 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,804 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,603 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   64,560 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   70,432 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    52,824 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 80,700 रुपये
24 कॅरेट- 88,040 रुपये
18 कॅरेट- 66,030 रुपये