₹6,46,29,31,95,000... गौतम अदानी यांनी 24 तासांत बदलला गेम, पुन्हा मिळवले श्रीमंतांच्या यादीत स्थान, मात्र मुकेश अंबानी...

Gautam Adani Net Worth : देशातील तिसरे सर्वात मोठे औद्योगिक घराणे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी सोमवारी जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले. पण त्यांनी मंगळवारी 24 तासांत सर्व गेम बदलला आणि पुन्हा एकदा जगातील टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवलं. 

नेहा चौधरी | Updated: Jan 15, 2025, 03:12 PM IST
₹6,46,29,31,95,000... गौतम अदानी यांनी 24 तासांत बदलला गेम, पुन्हा मिळवले श्रीमंतांच्या यादीत स्थान, मात्र मुकेश अंबानी... title=
Gautam Adani Net Worth

Gautam Adani Net Worth : जानेवारीचा तिसरा आठवड्याची सुरुवात ही देशातील तिसऱ्या क्रमांकाचे औद्योगिक घराणे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासाठी वाईट ठरली. सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहिला मिळाली. याचा परिणाम अदानी समूहाच्या शेअर्सवरही झाला. सोमवारी अदानीची एकूण संपत्ती $5.06 अब्ज म्हणजेच सुमारे 4,37,71,77,77,376 रुपयांची घसरण पाहिला मिळाली. याचा परिणाम जगातील सर्वात श्रीमंत टॉप 20 यादीतून ते बाहेर पडले. ही गोष्ट त्यांचा जिव्हारी लागली असं म्हणायला हरकत नाही. कारण गौतम अदानी यांनी 24 तासांमध्ये सर्व गेम चेंज केला. 

गौतम अदानी यांनी 24 तासांत बदलला गेम

मंगळवारीचा सुरुवात मकर संक्रांतीचा मुहूर्त गौतम अदानी यांच्यासाठी शुभ ठरला. अदानी समूहाच्या शेअर बाजारात त्यांच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये वादळी वाढ पाहिला मिळाली. काही शेअरमध्ये 20% तर काही शेअर्समध्ये 15% पर्यंत वाढ झाल्यामुळे एका रात्रीत गौतम अदानी यांनी सर्व गेम चेंज केलं. अवघ्या  24 तासांत गौतम अदानी यांच्या संपत्तीत  7.47 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 64000 कोटींहून अधिक वाढ पाहिला मिळाली. 

या संपत्ती वाढीमुळे सोमवारी जगातील श्रीमंत टॉप 20 यादीतून बाहेर पडलेले अदानी मंगळवारी पुन्हा एकदा या यादीत आपलं स्थान पटकवलंय. जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत ते 20 व्या स्थानावर आहेत. 

जगातील सर्वात श्रीमंत यादी टॉपवर कोण?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची संपत्ती मंगळवारी 5.01 अब्ज डॉलरने घसरली, तर मार्क झुकेरबर्गलाही 4.85 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. 4.27 अब्ज डॉलर्ससह मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस ($237 अब्ज) दुसऱ्या, झुकरबर्ग ($210 अब्ज) तिसऱ्या, लॅरी एलिसन ($182 अब्ज) चौथ्या आणि बर्नार्ड अर्नॉल्ट ($179 अब्ज) पाचव्या स्थानावर आहेत.
दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मंगळवारी 85.6 दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली. 90.2 अब्ज डॉलर्ससह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तो 17 व्या क्रमांकावर आहे.