Tibet Earthquake: नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.8 इतकी मोजली गेली आहे. चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत या भूकंपामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 62 लोक जखमी झाले आहेत.
ही घटना मंगळवारी सकाळी 9.05 मिनिटांनी तिबेटमधील डिंगरी काउंटी या भागात घडली. या ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. ते जमिनीपासून 10 किलोमीटर खोलीवर होते.
दरम्यान, भारत, नेपाळ, बांगलादेश आणि भूतानच्या अनेक भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. सिक्कीम, इतर ईशान्येकडील राज्ये, बिहार आणि पश्चिम बंगालसह उत्तर भारतातील विविध भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. तर काठमांडूमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अनेक लोक घराबाहेर पडून मोकळ्या ठिकाणी धावले.
Thirty-two people have been confirmed dead and 38 injured during the 6.8-magnitude earthquake that jolted Dingri County in the city of Xigaze in Xizang Autonomous Region at 9:05 a.m. Tuesday (Beijing Time), according to regional disaster relief headquarters. #XinhuaNews pic.twitter.com/eZWZRyrZRe
— China Xinhua News (@XHNews) January 7, 2025
चीनी रिपोर्टनुसार, भूकंपामध्ये अनेक इमारतीही कोसळ्या आहेत. सोशल मीडियावर या भूकंपाचे सीसीटीव्ही देखील व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये संपूर्ण घरे आणि इमारती उद्धवस्त झाल्याचं दिसत आहे. तर अनेक घरांना तडे गेले आहेत. भूकंप झालेल्या ठिकाणी बचाव कर्मचारी देखील दाखल झाले असून सध्या बचाव कार्य सुरु आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी स्थानिकांना जाड ब्लॅंकेट देखील देण्यात आले आहेत. सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोक कॉरिडॉरमधून पळताना दिसत आहेत. घरांच्या आतमध्ये असणाऱ्या वस्तू देखील हलत आहेत. तर काही गोष्टी जमिनीवर पडलेल्या दिसत आहेत.
एका तासाच्या आत त्याच शिजांग परिसरातून आणखी 5 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याची तीव्रता 4.7 आणि 4.9 इतकी होती. नाशिकमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.