पृथ्वी गोल आहे. पण गेल्या काही काळापासून पृथ्वी गोल की सरळ याबाबत वाद सुरू आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, पृथ्वी आपल्या अक्षावर फिरत राहते. व्हायरल व्हिडिओमध्ये पृथ्वी 24 तासांत आपल्या अक्षावर फिरताना दिसत आहे. सुरुवातीला या व्हिडिओवर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा एक टाइमलॅप व्हिडिओ आहे, जो आश्चर्यकारक आणि अद्बभुत असा आहे. बार्टोस वोज्झिन्स्क या नामिबियाच्या छायाचित्रकाराने आकाश स्थिर करून हे रेकॉर्ड केले आहे.
पृथ्वी फिरते हे आपल्याला माहीत आहे पण ते आपल्याला कधीच जाणवत नाही. अलीकडेच, नामिबियातील बार्टोझ वोज्झिन्स्क या छायाचित्रकाराने 24 तासांत पृथ्वी फिरतानाचा एक अद्भुत व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यास, तुम्हाला पृथ्वी आपल्या अक्षावर दिवसा रात्री फिरताना दिसेल. या क्लिपमध्ये कॅमेरा आकाशाच्या दिशेने स्थिर झाला असल्याने, पृथ्वीचे फिरणे रेकॉर्ड केले गेले आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @wonderofscience नावाच्या अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तो कोणी आणि कुठे रेकॉर्ड केला आहे याची माहिती दिली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर युझर्स आपापल्या प्रतिक्रियाही देत आहेत. काही वापरकर्ते याला आश्चर्यकारक म्हणत आहेत, तर काहींनी टाइमलॅप व्हिडिओच्या फिरण्याच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे कोणीतरी व्हिडिओ फेक म्हटले.