नोटांवर गांधीजींसोबतच लक्ष्मी- गणपतीचेही फोटो हवेत; केजरीवालांची केंद्र सरकारकडे मागणी

अरविंद केजरीवाल यांच्या या मागणीवर केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं औत्सुक्याचं.

Updated: Oct 26, 2022, 12:30 PM IST
नोटांवर गांधीजींसोबतच लक्ष्मी- गणपतीचेही फोटो हवेत; केजरीवालांची केंद्र सरकारकडे मागणी  title=
Delhi CM Arvind Kejriwal says there should be Lakshmi Ganeshji Photo on Indian Note

Lakshmi Ganeshi Photo on Indian Note: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी देशाची अर्थव्यवस्था (Economy) आणखी भक्कम करण्यासाठी म्हणून केंद्र सरकारकडे (Central Government) एक अजब मागणी केली आहे. भारतीय चलनांमध्ये येणाऱ्या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबतच गणपती (Ganesha) आणि लक्ष्मीचाही (Laxmi) फोटो असावा, अशा आशयाची मागणी त्यांनी केली आहे. देशाच्या आर्थिक समृद्धीसाठी देवदेवतांचा आशीर्वादही महत्त्वाचा आहे, असं कारण देत त्यांनी हा सूर आळवला.

इंडोनेशियातल्या नोटांवर गणपतीचा फोटो

(Indonesia) इंडोनेशियाचं उदाहरण देत केजरीवाल म्हणाले, तिथं 85 टक्के लोकसंख्या मुस्लिम धर्मीय असूनही त्यांच्या चलनांवर गणपतीचं चित्र/ फोटो आहेत. जर ते असं करु शकतात, तर आपण का नाही?

दिवाळीत पूजा करताना मनात आला हा विचार...

एका पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना केजीवाल म्हणाले, ‘(Diwali 2022) दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतेवेळी अचानकच माझ्या मनात विचार आला, की चलनांवर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो असावा. मी असं म्हणतच नाहीये, की यामुळं अर्थव्यवस्था सुधारेल. पण, यामुळे देवाचा आशीर्वाद तरी मिळेल.’

गांधीजींसोबत हवेत देवदेवतांचे फोटो

आम्ही कोणाचेही फोटो हटवण्याची मागणी करत नसून, एका बाजूला गांधीजींचा फोटो आणि दुसऱ्या बाजुला लक्ष्मी- गणपतीचा फोटो असावा इतकंच म्हणणं असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. सदर मुद्द्यावरून केंद्र सरकारला आपण रितसर पत्र लिहिणार असल्याचंही केजरीवाल यांनी सांगितलं.

दरम्यान, सध्या केजरीवाल दिल्ली नगर निगम निवडणुकांसाठी सज्ज होताना दिसत आहेत. सध्या भाजपचं आव्हान धुळीस मिळवण्यासाठी ते आशावादी असून, आता त्यांना यश मिळतं या हे पाहणं महत्त्वाचं असेल.