नवी दिल्ली : Coronavirus in india :देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट आली आहे. दरम्यान यामध्ये लहान मुलांसाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लहान मुलांना कोरोना संकटात सांभाळताना घाबरु नका. विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, काही नियमांबदल बदल करत केंद्र सरकारकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. पाच वर्षाखालील मुलांना मास्क नको, (Children under 5 do not need masks) असे स्पष्ट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन नियमावली जाहीर करताना म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून मोनोक्लोनल अॅँटीबॉडीजचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. 18 पेक्षा कमी वयाच्या मुलांना मोनोक्लोनल देऊ नका, अशा सक्त सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत. तसेच 5 पेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क वापरण्याची गरज नसल्याची केंद्र सरकाने नवी नियमावली जाहीर करताना म्हटले आहे.
घरातील लहान मुले देखील कोरोना संकटात सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी त्यांचे पालक आणि आरोग्य यंत्रणेवर आहे. लहान मुलांना मास्कची गरज नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी 6 वर्षांवरील मुलांना मात्र मास्क बंधनकारणक असणार आहे. कोरोनाला घाबरु नका, काळजी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. वय वर्ष 6 ते 11 यांनी पालक आणि डॉक्टरांच्या निगराणीखाली मास्कचा वापर करावा तसेच 18 वर्षां खालील वयाच्या मुलांना मोनोक्लोनल देऊ नका, अशा सक्त सूचना केंद्र सरकारने केल्या आहेत.