नवी दिल्ली : एका संशोधनादरम्यान, फेब्रुवारी महिन्यात जन्मलेली मुलं अधिक बुद्धीमान असल्याचं समोर आलं आहे. फेब्रुवारी महिन्यात जन्मलेली मुलं आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर लोकांमध्ये खास ओळख निर्माण करतात. हे लोक कोणत्याही समस्येवर मार्ग काढण्यात हुशार असतात. हा शोध २१,००० मुलांवर जवळपास सात वर्षांपर्यंत करण्यात आला होता. या संशोधनानुसार, फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये तणावाचं प्रमाण कमी असल्याचं पाहायला मिळतं. या मुलांमध्ये चिडचिडेपणाही कमी असतो.
परंतु हे लोक कोणतीही गोष्ट लगेच मनाला लावून घेतात. संशोधनकर्त्यांच्या मते, फेब्रुवारीमध्ये जन्मलेले लोक हटके व्यवसाय निवडण्यावर विश्वास ठेवतात. या महिन्यातील अधिकतर लोक, कलाकार किंवा पोलीस सेवेत जाणं पसंत करतात.
न्यूझिलँडमध्ये संशोधकांनी ४ ते ५ वयोगटातील मुलांवर संशोधन केलं. यात मुलांचे विचार, स्वभाव, एकाग्रता, उधळपट्टी, मैत्री करण्याची कला यााबाबत विश्लेषण करण्यात आलं होतं. या महिन्यात जन्मलेली मुलं व्यावहारिकदृष्ट्या अधिक उत्तम असल्याचं आढळून आलं.
यापूर्वी, येल विद्यापिठातील संशोधकांनी त्यांच्या नव्या संशोधनात, नैसर्गिकरित्या जन्मलेली मुलं, ऑपरेशनद्वारे जन्मलेल्या मुलांच्या तुलनेत अधिक बुद्धिमान असल्याचा दावा केला आहे. एका रिपोर्टनुसार, महिला नैसर्गिकरित्या मुलांना जन्म देतात, त्यावेळी त्यांच्यात एक विशेष प्रोटीनचा स्तर अधिक असल्याचं आढळतं. यामुळे मुलांच्या बुद्धीमत्तेत वाढ होते.
नैसर्गिकरित्या जन्मलेल्या मुलांमध्ये 'यूसीपी २' प्रोटीनचा उच्च स्तर त्यांची बुद्धीमत्ता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. 'आयक्यू' वाढवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण तत्व आहे. या अभ्यासाचा निकाल ‘पीएलओएस वन’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.
'डॅशिंग डॉनची, डार्लिंग डीन'; पाहा नव्या भूमिकेत देवदत्त नागे
हिंगणघाट शिक्षिका जळीत कांड : आरोपीच्या घरची मंडळी म्हणतात...
World Cancer Day: कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
हिंमत असेल तर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, केजरीवालांचे भाजपला आव्हान
'राहुल मधल्या फळीतच, हे दोघं ओपनिंगला येणार', विराटचं स्पष्टीकरण
दुर्गम भागात तैनात सैनिकांना ना चांगलं जेवण, ना हत्यारं - कॅगचा अहवाल
वनडे सीरिजआधी न्यूझीलंडला धक्का, विलियमसन २ मॅचसाठी बाहेर
'मोदी सरकारने 'सीट डाऊन इंडिया, शटडाऊन इंडिया, शटअप इंडिया' योजना सुरु कराव्यात'