Crime News : गंभीर गुन्ह्यातला एका कैद्याची (Prisoner) प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात (Hopital) दाखल करण्यात आलं. त्याच्या पोटात दुखत असल्याने डॉक्टरांनी त्याचा एक्स रे (X-ray) काढला. पण एक्स रे पाहून डॉक्टरांसह पोलिसही हैराण झाले. रिपोर्ट आल्यानंतर रुग्णाला तात्काळ इमरजन्सी वॉर्डात (Emergency Ward) हलवण्यात आलं. या कैद्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण यानिमित्तान तुरुंग प्रशासनाच्या, सुरक्षाव्यवस्थेवर मात्र पुन्हा एकदा प्रश्नचिन्हा उपस्थित झालं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
बिहारमधल्या (Bihar) गोपालगंज तुरुंगात इंदरवा रफी गावातील कैदी कैशर अली हा गेल्या काही महिन्यांपासून एका गुन्ह्या प्रकरणी शिक्षा भोगतोय. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्या पोटात असहाय्य वेदना होत होत्या, त्यामुळे तुरुंग प्रशासनाने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात भरती केलं. डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढला असता, त्यात रुग्णाच्या पोटात चक्क मोबाईल आढळला. ही बाब डॉक्टरांनी पोलिसांच्या कानावर घातली. चौकशीत मोबाईल ठेवल्याने पकडले जाऊ या भीतीने मोबाईल गिळला असं त्या रुग्णाने पोलिसांना सांगितलं.
आरोपी कैशर अली याच्या शस्त्रक्रियेसाठी (Operation) एक समिती स्थापन करण्यात आली आहे. योग्य उपचारांसाठी आरोपीला पटना इथं पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कैशर अलीला 17 जानेवारी 2020 मध्ये अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात बंद आहे. त्याआधीही कैशर अलीने अनेकवेळा तुरुंगाची हवा खाल्ली आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न
या घटनेनंतर तुरुंगाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाला आहे. कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही कैद्यापर्यंत मोबाईल पोहोचला कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी तुरुंगप्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.