World Multiple Sclerosis Day : मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक

World Multiple Sclerosis Day 2023 : 30 मे हा दिवस जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणून पाळला जातो. या आजाराची नेमकी कारणे कोणती? त्यावर उपाय कोणते ते जाणून घेऊयात...   

श्वेता चव्हाण | Updated: May 30, 2023, 01:31 PM IST
World Multiple Sclerosis Day : मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक  title=
World Multiple Sclerosis Day

Multiple Sclerosis Symptoms : गेल्या काही वर्षांमध्ये मल्टिपल स्क्लेरोसिस (Multiple Sclerosis) या आजाराबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. मेंदुशी निगडित असलेल्या या आजाराबद्दल फारशी कोणाला माहिती नसल्यामुळे अनेकजण किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच हेच आजार पुढे जाऊन उग्र रूप धारण करतात. नेमकं मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे कोणता आजार? त्याची कारणे आणि उपाय काय आहेत ते जाणून घेऊयात... 

मल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) हा मेंदूतील चेतापेशींच्या काठिण्याचा आजार आहे. याला ऑंटो इम्यून आजार असंही म्हटले जाते. एखादी व्यक्ती अनुवांशिकदृष्ट्या असुरक्षित असल्यास, शरीरात जीवनसत्वांचे प्रमाण कमी असेल किंवा विषाणू आणि पर्यावरणीय घटकांचा परिणाम यामुळे हा विकार होऊ शकतो. मेंदू व पाठीचा कणामधील मायलिनचा थर (Myelin layer) खराब करणारा आजार म्हणून मल्टिपल स्क्लेरोसिस ओळखला जातो. याचा प्रभाव अशक्तपणापासून ते शारीरिक अक्षमतेपर्यंत होतो. 

आज जगभरात 2.8 दक्षलक्ष लोकांना हा आजार आहे. मल्टिपल स्क्लेरोसिसमुळे (Multiple Sclerosis) रुग्णाची चालण्याची क्षमता कमी होऊ शकते. शरीराच्या वेगवेगळ्या भागांची हालचाल होऊ शकते आणि दृष्टी कमी होऊ शकते. हा आजार कशामुळे होतो यावर अद्याप पुरेसे संशोधन झालेले नाही. शरीर आणि मेंदू यांच्यातील संवाद तुटत असल्याने, रोगाने ग्रस्त लोक शरीराच्या कार्यांमध्ये समन्वय साधू शकत नाहीत. 

ही आहेत या आजाराची लक्षणे

या आजाराच्या रूग्णांमध्ये चक्कर येणे, शरीराच्या एका बाजूला किंवा हातापायांमध्ये अशक्तपणा येणे, हालचालीमध्ये असंतुलन, थरथरणे, थकवा, वेदना, दृष्टिदोष, दुहेरी दृष्टी, चक्कर येणे, मूत्राशय, पोटदुखी आणि लैंगिक समस्या यासह अनेक लक्षणे दिसतात. 

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त दिसून आला. सरासरी वयाच्या 25 ते 30 वयात या आजाराची सुरुवात होते. काही रुग्णांमध्ये आजाराची लक्षणे काही दिवस किंवा आठवडे राहतात. त्यानंतर काही महिन्यांनी किंवा अनेक वर्षांनंतर पुन्हा रोगाची लक्षणे पुन्हा दिसू लागतात. याला 'रिलॅप्सिंग-रिमिटिंग' असेही म्हणतात. 

उपाय

मल्टिपल स्क्लेरोसिस असलेल्या रुग्णांवर अनेकदा रोगप्रतिकारक-दमन करणारी औषधे आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीजने उपचार केले जातात. पण हीच औषध जास्त काळ वापरले जात नाही. जर तुम्ही दीर्घकाळ औषधे वापरत असाल तर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणूनच सेल्युलर थेरपी, स्टेम सेल किंवा उपचार पद्धती वापरल्या जाऊ शकतात. तसेच, ऑटोलॉगस स्नायू-आधारित थेरपीमध्ये, रुग्णाच्या स्वतःच्या शरीरातील स्टेम पेशींचे प्रत्यारोपण केले जाते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती पुनर्संचयित होते.

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)