मनुक्यांच्या पाण्याचे सेवन आहे आरोग्यासाठी लाभदायक; शरीराला मिळतात 'हे' फायदे

मनुक्यांचं सेवन केल्याने शरीराला मिळणाऱ्या फायद्यांविषयी तर कित्येकजणांना माहित असेल. मात्र, मनुक्यांच्या पाणी प्यायल्याचे सुद्धा तितकेच आरोग्यदायी फायदे आहेत. अलिकडच्या वर्षांत मनुक्याचे पाणी पिण्याचा ट्रेंड प्रचलित झाला आहे. जाणून घेऊयात, मनुक्यांचे पाणी पिण्याचे फायदे.  

Updated: Feb 5, 2025, 02:13 PM IST
मनुक्यांच्या पाण्याचे सेवन आहे आरोग्यासाठी लाभदायक; शरीराला मिळतात 'हे' फायदे title=

Raisin Water Benefits: सुकामेवा आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे आपल्या सर्वांनाच माहित आहे. चविष्ट असण्यासोबतच त्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. या सुकामेव्यांमध्ये मनुके अगदी आवडीने खाल्ले जातात. मनुक्यांचं सेवन केल्याने शरीराला मिळणाऱ्या फायद्यांविषयी तर कित्येकजणांना माहित असेल. मात्र, मनुक्यांच्या पाणी प्यायल्याचे सुद्धा तितकेच आरोग्यदायी फायदे आहेत. अलिकडच्या वर्षांत मनुक्याचे पाणी पिण्याचा ट्रेंड प्रचलित झाला आहे.

मनुक्याचं पाणी आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे मानले जाते. खास करुन सकाळी उपाशीपोटी मनुक्यांच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. उत्तम आरोग्यासाठी मनुक्यांच्या पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. याचे सेवन केल्याने शरीराला अधिक प्रमाणात ऊर्जा मिळते तसेच बऱ्याच आजारांपासून दूर राहता येते. जाणून घेऊयात, मनुक्यांचे पाणी पिण्याचे फायदे.

शरीराला डीटॉक्स करते

मनुक्याचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदतशीर ठरते. हे लिव्हर आणि किडनी स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त आहे. ज्यामुळे शरीरातील मेटाबॉलिजम सुधारते. नियमितपणे मनुक्यांचे पाणी प्यायल्याने त्वचा नितळ आणि चमकदार होते.

एनर्जी बूस्टर

मनुक्यांमध्ये नैसर्गिक शूगर, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. सकाळी उपाशीपोटी मनुक्यांचे पाणी प्यायल्याने दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो. तसेच मनुक्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरातील रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. 

पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत

मनुक्यांच्या पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास कारणीभूत असते तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. सकाळी उपाशीपोटी मनुक्यांचे पाणी प्यायल्याने पोट साफ होते तसेच गॅस आणि ॲसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

रक्तदाब नियंत्रित ठेवता येते

मनुक्यांमध्ये पोटॅशियम अधिक प्रमाणात असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठी मनुक्यांचे खूप फायदेशीर आहे. मनुक्यांमध्ये असलेले मॅग्नेशियम शारीरिक तणाव कमी करण्यासही उपयुक्त आहे.

हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी फायदेशीर

मनुके हे शरीरातील लोहाचे उत्तम स्त्रोत आहेत. मनुक्यांच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनच्या पातळीत वाढ होते. एनिमिया या आजाराने ग्रस्त असलेल्यांनी मनुक्यांच्या पाण्याचे सेवन केले पाहिजे. याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताचेसुद्धा प्रमाण वाढण्यास मदत होते. 

हाडांना मजबूत बनवते

मनुक्यांमध्ये कॅल्शियम आणि बोरॉन सारखे घटक आढळतात, जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. नियमितपणे मनुक्यांचे पाणी प्यायल्याने ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

मनुक्यांचे पाणी वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेलं वाटतं, ज्यामुळे अतिरिक्त कॅलरीजचे प्रमाण कमी होते. याव्यतिरिक्त, ते मेटाबॉलिजममध्ये वाढ होऊन वजन कमी करण्यास मदत होते.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)