पतंजली समूह यमुना एक्स्प्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण परिसरात औद्योगिक विस्ताराचा वेगाने प्रसार करत आहे. पतंजली आयुर्वेद लिमिटेडचेव्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी आज येईदा येथील सेक्टर २४ए येथील प्लॉट क्रमांक १ए ला भेट दिली. येथे त्यांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्कच्या आमागी योजनांविषयी चर्चा केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणुक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने हा प्रकल्प विकसीत केला जात आहे. या ठिकाणी एक अत्याधुनिक डेअरी प्लांट आणि औद्योगिक प्रोत्साहन केंद्र उभारले जाणार आहे. त्यामुळं स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील व्यावसायिक रोजगारांना चालना मिळणार आहे.
आचार्य बाळकृष्ण जी यांनी म्हटलं आहे की, औद्योगिक पार्क 1,600 कोटींच्या गुंतवणुकीसाठी विकसित करण्यात येणार आहे. ज्यामुळं या क्षेत्राची अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया अभियान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या इन्वेस्ट युपी मिशनशी सुसंगत आहे. ही योजना पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर पतंजली फूड अँड हर्बल पार्क 3 हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसंच, यामुळं प्रदेशातील लोकांना मोठा फायदा मिळणार आहे.
पतंजली समूह आधीच एक औद्योगिक पार्क विकसीत करत आहे. जिथे औद्योगिक प्रकल्पासाठीच्या जागा लहान आणि मध्य आकाराच्या व्यापाऱ्यांसाठी सब-लीजद्वारे उपलब्ध करुन दिली जात आहे. येणाऱ्या फूड अँड हर्बल पार्कमुळे हा उपक्रम आणखी बळकट होईल, ज्यामुळे एफएमसीजी, आयुर्वेद, डेअरी आणि हर्बल उद्योगांना स्थानिक पातळीवर औद्योगिक स्वावलंबन वाढण्याची आणि प्रोत्साहन देण्याची संधी मिळेल.
औद्योगिक उद्योगाला भेट दिल्यानंतर आचार्य बालकृष्ण यांनी तज्ज्ञ आणि उद्योगातील वरिष्ठ प्रतिनीधींसह YEIDA कार्यालयाला भेट दिली. तिथे त्यांनी सीईओ श्री अरुणवीर सिंग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.
दरम्यान, CEO अरुणवीर सिंह यांनी YEIDA क्षेत्रात होणाऱ्या औद्योगिक विकासाबद्दल त्यांचे विचार त्यांनी मांडले. औद्योगिक प्रकल्पांना पाठिंबा देणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि या क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हे YEIDA चे प्राधान्य आहे, असं त्यांनी सांगितलं. स्थानिक व्यावसायिक आणि उद्योगांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी प्रदेशाचा विकास संतुलित आणि समावेशक पद्धतीने पुढे नेण्यासाठी सर्व प्रकल्पांवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करून, हा प्रकल्प उत्तर भारतातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून YEIDA चे स्थान आणखी मजबूत करेल. या उपक्रमामुळे नवीन गुंतवणूक आकर्षित होईल, स्थानिक उद्योजकतेला चालना मिळेल आणि उत्तर प्रदेशच्या औद्योगिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान मिळेल.
या भेटीमुळे YEIDA ला उच्च-वाढीच्या औद्योगिक कॉरिडॉरमध्ये रूपांतरित करणे, जागतिक दर्जाच्या औद्योगिक सुविधा विकसित करणे आणि व्यावसायिक समुदायाला प्रचंड संधी उपलब्ध करून देणे यासाठी एक सामायिक दृष्टीकोन समोर आला. हा प्रदेश उत्पादन आणि औद्योगिक कंपन्यांसाठी पसंतीचे ठिकाण बनण्यास सज्ज आहे, जो स्वावलंबी आणि समृद्ध भविष्याचा पाया रचेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)