कोण बाहुबली, कोण शिवगामी? धस, फडणवीसांसमोर पंकजा मुंडेंनी सगळंच सांगितलं…

Beed:  शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी तसेच बोगदा कामाचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला. यावेळी पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्या भाषणाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Pravin Dabholkar | Updated: Feb 5, 2025, 03:18 PM IST
कोण बाहुबली, कोण शिवगामी? धस, फडणवीसांसमोर पंकजा मुंडेंनी सगळंच सांगितलं… title=
बीड सभा

Beed: बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात आष्टी उपसा सिंचन योजने अंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी तसेच बोगदा कामाचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार सुरेश धस, आमदार पंकजा मुंडे हे उपस्थित होते. यावेळी सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांचे भाषण उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरला. आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंचे नाव घेतले पण रामदास कदम यांचे खाते पंकजा यांच्याकडे आहे असे आणि या कामाला प्रीतम मुंडे यांनी मदत केली म्हणून त्यांचे आभार मानले.आमची कुणाकडून अपेक्षा नाही फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबली करू शकतात.मी साहेबांचा लाडका आहे, माझे ते लाड करतात...मझं पामराने तुम्हाला काय सांगावे.मी जिवंत राहील ना राहील इथं भाजप आमदार राहील, असे ते आपल्या भाषणात म्हणाले. 

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

यानंतर पंकजा मुंडे यांनी उपस्थितांच्या नावांचा उल्लेख करत भाषणाला सुरुवात केली. हे सर्व युवा बांधव तुम्हाला बाहुबली म्हणून संबोधित करत आहेत. कार्यक्रमाचा उत्साह वाढवत आहेत. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सर्व बाहुबली संबोधित करतात. तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात. आमच्या कॅबिनेटचे तुम्ही प्रमुख आहात. तुमच्याबद्दल मला आदरच आहे. तुमच्याबद्दल मला ममत्व भाव मनात येतोय. कारण हे लोकं मला काही वर्षांपुर्वी शिवगामी म्हणत होते. सुरेश धस तुम्ही सिनेमाचे डायलॉग म्हणता तसेच मी म्हणतेय.  'मेरा वचन ही मेरा शासन' हे शिवगामीच वाक्य असतं. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे. बोलणं एक आणि करणं एक हे माझ्या रक्तात नाही, असे पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हणाल्या. हा कार्यक्रम शासनाचा आहे म्हणून मी आले. त्यामुळे बॅनरवर कुठे फोटो आहे, कार्यक्रमाला खुर्ची आहे का? हे मी पाहिले नाही. मीपण मुख्यमंत्र्यांची लाडकी आहे. बीड जिल्हा खूप नशीबवान आहे. बीडमध्ये 5 ते 6 आमदार निवडून येतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. मी मंत्री झाले आणि तुम्ही मुख्यमंत्री आहात. थोडसं नशीब आमचंही आहे.  देवेंद्र फडणवीस थोडेशे ओशाळलेयत. त्यांना बाहुबली बोलणं फारस रुचणार नाही. अस्वस्थ करणार आहे. काम करा आणि कामाने किर्ती रुपाने व्हा. हे संस्कार भाजप आणि संघाचे आहेत. या संस्कारातील नेता मुख्यमंत्री असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. 

काय म्हणाले सुरेश धस?

काही लोक म्हणतात बीड जिल्हा बदनाम होतोय, मात्र या जिल्ह्यातच क्रांतिसिंह नाना पाटील, रखमा पाटील,केशर काका ,बबनराव ढाकणे, प्रमोद महाजन याना निवडून दिले, आणि गोपीनाथ राव तर बोलायलाच नको, पहाड एवढा नेता होता...या जिल्ह्याने अनेक नेते दिले असे सुरेश धस यांनी यावेळी सांगितले मात्र पंकजा आणि धनंजय मुंडे यांचे नाव त्यांनी सोयीने टाळल्याचे पाहायला मिळाले. 
मात्र काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिला म्हणून नाव खराब झाले.  मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख प्रकरणात कणखर भूमिका घेतली तुम्ही म्हणाले कुणालाच सोडणार नाही, आम्हाला विश्वास आहे, राख, वाळू, माफियांना मोक्का लावा ही आमची मागणी असल्याचे धस म्हणाले. 

2019 पासून कटकारस्थान करून मला संपवायचा प्रयत्न झाला पण तुम्ही माझा पाठीशी इभे राहिला आमच्या दारात रात्री पोलीस यायचे आम्ही सहन केला.मी दिवार चित्रपट बघितला होता कॉलेज मध्ये त्यात शशी कपूर म्हणतो मेरे पास मा है..माझी दुसरी आई जिवंत आहे मी नाव लपवले नाही.मला मंत्रिपद नको पालक मंत्री पद नको फक्त 7.50 टी एम सी पाणी द्या. मला म्हणतात तेरे पास क्या है मी म्हणतो मेरे पास देवेंद्र  फडणवीस साहेब का आशीर्वाद है, असे म्हणत त्यांनी दिवार सिनेमातील डायलॉग मारला.