TB medicines shortages : औषधे पुरवून पुरवून खा! तीन महिने टीबीच्या औषधांचा तुटवडा

TB medicines shortages : सध्या क्षयरोग (टीबी) मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. देशात दरवर्षी 29 लाख लोकांना या संसर्गजन्य रोगाची लागण होते. महाराष्ट्रात दोन लाख नवीन क्षयरुग्णांची नोंद झाली होती, त्यापैकी 1 हजार रूग्णांचा पुरेसा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 10, 2024, 04:32 PM IST
TB medicines shortages : औषधे पुरवून पुरवून खा! तीन महिने टीबीच्या औषधांचा तुटवडा title=

TB medicines shortages in Marathi : खचाखच गर्दीने भरलेल्या लोकलमधून प्रवास, दाट लोकवस्ती, कोंदट घरे, प्रदूषण, कुपोषण, अपुरे उपचार आदींसह विविध कारणांमुळे अनेकजण टीबी सारख्या आजारांचे बळी पडतात. महाराष्ट्रात आढळून आलेल्या टीबी रुग्णांच्या 66 टक्के रुग्ण हे मुंबई शहरातील असल्याचा हा सर्वोच्च पुरावा आहे. मुंबई शहरात 2017 मध्ये 4 हजार 374 नवीन क्षयरुग्णांची नोंद झाली आहे. असे असताना ही महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये टीबीच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला. 

येत्या काही महिन्यांत औषधांच्या तुटवड्याचे संकट निर्माण होणार असल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्यासाठी राज्य सरकारांना कळवण्यात आले आहे. औषधांचे उत्पादन, वितरण आणि पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने पुढील तीन महिने 
टीबी रुग्णांना नियमित औषधे मिळणे कठीण होणार आहे.  महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात अवघे 15 दिवस उरले इतकाच साठा आहे. 

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्तरावर क्षयरोग रुग्णांना फक्त '3 FDC A' औषधे दिली जातात. गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह संपूर्ण देशात क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा निर्माण झाला. औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान तीन महिने लागण्याची शक्यता आहे. '3 FDC A' या औषध 'तुटवडा निर्माण झाला असून', हे औषध विशेषत: नव्याने निदान झालेल्या क्षयरुग्णांना दिले जाते.

तसेच नव्याने निदान झालेल्या क्षयरुग्णांना सुरुवातीला '4 FDC A' औषध दोन महिन्यांसाठी आणि नंतर '3 FDC A' औषध दोन महिन्यांसाठी दिले जाते. त्यामुळे गेल्या तीन-चार महिन्यांत निदान झालेल्या रुग्णांना ‘एफडीसी ए’ औषध देण्याची वेळ आली आहे. त्यांना ही औषधे न मिळाल्यास, त्यांना बहुऔषध-प्रतिरोधक क्षयरोग (MDR-TB) होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या रुग्णांमधील टीबी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 

राज्यातील टीबी रुग्णाची संख्या 

2019: 2,27,004
2020: 1,60,072
2021 : 2,00,240
2022: 2,33,873
2023: 2,27,646
2024 : 48,383