हिवाळ्यात हात-पाय सुन्न होतात? जाणून घ्या कारणे आणि 5 घरगुती उपाय

संपूर्ण भारतात कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. या ऋतूमध्ये हात-पाय सुन्न होणे, काटे येणे, नसांना दुखणे अशा समस्या होतात.

- | Updated: Dec 13, 2024, 03:11 PM IST
हिवाळ्यात हात-पाय सुन्न होतात? जाणून घ्या कारणे आणि 5 घरगुती उपाय  title=

 थंड वातावरणात आपण आपल्या शरीराची विशेष काळजी घेणे आणि या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी योग्य उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. थंडीमुळे हात पाय सुन्न होत असतील किंवा नसांमध्ये दुखत असेल तर घाबरण्याची गरज नाही.

हे 5 घरगुती उपाय केल्याने 'या' समस्येपासून दूर होऊ शकतात 

1. हाता-पायाला गरम पाण्याचा शेक 
आपले हात आणि पाय कोमट पाण्यात बुडवावे. हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. थंडीत रक्ताभिसरण सुधारण्यासाठी गरम पाण्याचा उपयोग करावा. एक बादली कोमट पाणी घ्या आणि त्यात हात-पाय 10-15 मिनिटे बुडवा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि सुन्नपणा कमी होतो.  

2. मोहरीच्या तेलाने मसाज करणे  
मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने शरीराला उष्णता मिळते. यामुळे रक्तवाहिन्यांचा प्रवाह सुधारतो आणि कडकपणा कमी होतो. नियमित मसाजमुळे बधीरपणा, वेदना आणि काटेरीपणाही कमी होतो.  

3. हलका व्यायाम आणि स्ट्रेचिंग  
थंडीत शरीर सक्रिय ठेवणे महत्त्वाचे आहे. हलका व्यायाम,स्ट्रेचिंग केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर उष्ण राहते. यामुळे सुन्नपणा आणि नसांच्या समस्या कमी होतात.  

4. लसूण आणि आल्याचे सेवन  
लसूण आणि आले यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. आल्याचा किंवा लसणाचा नियमित वापर केल्याने शरीर उबदार राहते. लसणाच्या काही पाकळ्या आणि आल्याचा चहा थंडीच्या दिवसात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. हे शरीर आतून उबदार ठेवते आणि मज्जातंतूंचे आरोग्य सुधारते.

5. पुरेसे पाणी पिणे आणि हायड्रेटेड राहणे 
हिवाळ्यात पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो. सूप, हर्बल चहा आणि कोमट पाणी प्यायल्याने शरीराची आर्द्रता राखली जाते.  

थंडीत हा त्रास का होतो? 
थंड हवामानामुळे रक्ताभिसरण मंदावते आणि रक्तवाहिन्या आकसतात. त्यामुळे हात-पाय सुन्न होणे, काटे येणे किंवा नसांमध्ये वेदना होण्याचा त्रास होतो. दीर्घकाळ थंड वातावरणात राहिल्यास हा त्रास वाढू शकतो.  

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? 
घरगुती उपाय करूनही त्रास कायम राहत असल्यास किंवा वेदना असह्य होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. विशेषतः बधीरपणा दीर्घकाळ टिकत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)