रोज रात्री खा २ वेलची ; दूर होतील आरोग्याच्या या समस्या

पदार्थाचा स्वाद वाढवणाऱ्या वेलचीचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.

Updated: May 22, 2018, 08:49 AM IST
रोज रात्री खा २ वेलची ; दूर होतील आरोग्याच्या या समस्या title=

मुंबई : पदार्थाचा स्वाद वाढवणाऱ्या वेलचीचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. दररोज वेलचीचे सेवन केल्याने पुरुषांची शारीरिक कमजोरी दूर होते. त्याचबरोबर स्थूलता दूर होण्यास मदत होते. इतकंच नाही तर वेलचीचे असे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. पाहुया कोणत्या आहेत त्या समस्या...

स्थूलता

सुटलेल्या पोटापासून मुक्ती मिळवण्यासाठी रात्री २ वेलची खावून गरम पाणी प्या. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॉमिन B1, B6, C यामुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. तसंच यातील फायबर्स आणि कॅल्शियममुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

पुरुषांमधील शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी

रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलचीचे सेवन पुरुषांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे नपुंसकता कमी होण्यास मदत होते. त्यासाठी गरम पाण्यात किंवा दुधात वेलची घालून प्या.

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी

वेलचीमुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. यात पोटॅशियम आणि फायबर्स अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तसंचार सुरळीत होतो.

युरीन इंफेक्शनपासून सुटका

दररोज वेलचीचे सेवन केल्याने युरीन इंफेक्शनवर आराम मिळतो. युरीन इंफेक्शन लवकर ठीक करण्यासाठी वेलची खाणे फायदेशीर ठरेल.

पचनतंत्र सुधारण्यास

अनेकदा बाहेरचे पदार्थ, अरबट चरबट खाल्याने पचनतंत्र बिघडते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी वेलची अत्यंत फायदेशीर ठरते. दररोज वेलची खाल्याने पचनतंत्र सुधारते. भूक, अॅसिडीटी, गॅस, छातीतील जळजळ, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर वेलची खाणे फायदेशीर ठरते.

केस मजबूत होण्यासाठी

रात्री २ वेलची पाण्यासोबत खाल्याने केसांची मुळे मजबूत होतात. केसगळती कमी होते आणि केस काळेभोर होतात. केसातील कोंडा दूर होण्यासाठीही वेलची खाणे फायदेशीर ठरते.