हैदराबाद मेट्रो रेल्वेने 17 जानेवारी रोजी एका दात्याचे हृदय अवघ्या 13 मिनिटांत 13 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एक ग्रीन कॉरिडॉर तयार केला. यामुळे मेट्रो अधिकारी, वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य सुनिश्चित झाले.
शहरातील एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हृदय पोहोचवण्यात हैदराबाद मेट्रोने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यासाठी हैदराबाद मेट्रोसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. या ग्रीन कॉरिडॉरमधून मेट्रोने 13 मिनिटांत 13 किलोमीटरचे अंतर कापले आणि हृदयापर्यंत पोहोचली. हैदराबाद मेट्रोच्या या प्रयत्नाचे खूप कौतुक होत आहे. या ग्रीन कॉरिडॉरद्वारे, दात्याचे हृदय जलद दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले.
दात्याचे हृदय 17 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता एलबी नगरमधील कामिनेनी रुग्णालयातून लकडी-का-पुल परिसरातील ग्लेनेगल्स ग्लोबल रुग्णालयात नेण्यात आले. हैदराबाद मेट्रो रेल, वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालय प्रशासन यांच्यातील काळजीपूर्वक नियोजन आणि सहकार्यामुळे हे प्रयत्न शक्य झाले असल्याचे म्हटले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया डॉक्टरांच्या देखरेखीखाली पूर्ण झाली.
13 Kilometers, Covered in 13 Minutes Across 13 Stations.
Hyderabad Metro Facilitates Green Corridor for Heart Transplantation
In a remarkable display of efficiency and coordination, Hyderabad Metro Rail created a dedicated Green Channel on 17th January 2025 at 9:30 PM. pic.twitter.com/SaPtkmqcO8
— Hyderabad Metro Rail Ltd. (@HMRLHydmetro) January 18, 2025
मेट्रोने एका व्यक्तीचा जीव वाचवण्यात आपलं मोठं योगदान दिलं आहे. एका व्यक्तीचं हृदय अवयवदान करण्यात आलं आहे. यासाठी मेट्रोने 13 मिनिटांत 13 किमीपर्यंतचा प्रवास केला आहे. यामुळे त्या डोनरचं हृदय ट्रान्सप्लांट करण्यासाठी वेळेत पोहोचलं आहे.
17 जानेवारी 2025 च्या रात्री, हैदराबाद मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने ताबडतोब निर्णय घेतला की दात्याचे हृदय जीवनरक्षक प्रत्यारोपणासाठी गरजूंपर्यंत वेळेत पोहोचले पाहिजे. विनंती कळताच, ताबडतोब एक रणनीती आखण्यात आली आणि अशा प्रकारे हैदराबाद मेट्रोने या हृदयाचा यशस्वी प्रवास आणि उत्तम उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं.