मुंबई : पोट फुगणं किंवा ब्लोटिंग ही एक अशी समस्या आहे, ज्यामध्ये खाण्यापिण्यात थोडासा जरी बदल झाला, तरी त्याचा परिणाम खूप वाईट होतो. पोट फुगण्याची ही समस्या जाणून घेण्यासाठी पोटाची काही लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला पोटात जास्त जळजळ होत असेल किंवा पोट फुगल्यासारखे वाटत असेल, गॅस किंवा दुखण्याची समस्या असेल तर समजून जा की तुम्हाला पोट फुगण्याची समस्या उद्भवू लागली आहे. परंतु काळजी करण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या आहारात काही छोटे बदल करून यापासून आराम मिळवू शकतात.
जर तुम्ही अनेकदा पोट फुगण्याची तक्रार करत असाल, तर तुम्ही ताबडतोब तुमच्या जेवणातून काही गोष्टी काढून टाका. ज्यामुळे ही तक्रार उद्भवणं कमी होईल.
बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये ब्रोकोलीचा समावेश करतात. कारण ब्रोकोली आरोग्यासाठी खूप चांगली असल्याचं मानलं जातं.
परंतु जर तुम्हाला पोट फुगण्याची तक्रार असेल, तर ब्रोकोलीचा आहारात समावेश न करणं चांगलं. अशा परिस्थितीत ब्रोकोलीमुळे पचनामध्ये समस्या निर्माण होऊ शकताता. ज्याचा परिणाम पोटात गॅस किंवा जळजळ होऊ शकतो.
सफरचंद रोग प्रतिकारशक्ती वाढवते. पण ब्लोटींगची किंवा पोट फुगण्याची समस्या असलेल्यांनी सफरचंद न खाण्याचा सल्ला दिला जातो.
असं म्हणतात की, 'एक सफरचंद एका दिवसाला खाल्याने ते, डॉक्टरांना दूर ठेवतं'. परंतु हे लक्षात घ्या की, सफरचंदात भरपूर फायबर असते. काही लोकांच्या पोटासाठी चांगले नसतात, ज्यामुळे त्यांना गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे सफकचंद खाणं टाळा किंवा त्याची साल काढून तुम्ही ते खाऊ शकता.
लसणात फ्रक्टन्स नावाचे तत्व असते. हा घटक ब्लॉटिंगची समस्या झपाट्याने वाढवतो. त्यामुळे कमीत कमी लसूण खाणे योग्य ठरेल. यामुळे तुमचे पोट फुगणार नाही.
सोयाबीन हे पचन्यासाठी थोडे जड असते. यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे पोट जड झाल्यासारखे वाटते. त्यानंतर पोट फुगणे किंवा दुखणे अशा तक्रारी उद्भवू लागतात.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)