Almonds Benefits For Diabetes And Cholesterol: बदाम खाण्याचे फायदे तुम्हीला कोणीतरी सांगितले असतील, किंवा तुम्ही ते वाचले आणि ऐकले असतील. बदामातील (Benefits of Almonds) सत्व तुमच्या त्वचासाठी आणि केसांसाठी फाद्याचं आहे. बदामामुळे तुमचं निरोगी ठेवण्यात मदत होते. तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल (Cholesterol), ब्लड शुगर (blood sugar) आणि वजनाशी (Weight) देखील बदामाचा थेट संबंध आहे. त्यासंबंधीचा एक अहवाल नुकताच समोर आला आहे.
फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन (Frontiers in Nutrition) या जर्नलमध्ये एक अहवाल समोर आलाय. या अहवालामध्ये अनेक खुलासे करण्यात आलेत. 25 ते 65 वयोगटातील तब्बल 400 व्यक्तींवर हा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर काही निश्कर्ष समोर आले आहेत.
बदामामुळे एकूण कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स नियंत्रणात राहतं, असं या संशोधनात समोर आलं आहे. नियमित बदाम खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी असतो.
आणखी वाचा - नेहमीच ऐकूण असाल की Whiskey पिऊ नका, मात्र तुम्हाला माहितीयेत का त्याचे फायदे?
बदाम हा सुका मेव्यातील सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. काजूपेक्षाही बदामातील सत्व शरिरासाठी फायद्याचे असतात. बदाम खाल्ल्याने कंबरेचा घेर आणि ग्लुकोज कमी होतो. त्याचा थेट परिणाम शरिरावर दिसून येतो. बदाम खालल्याने बीटा पेशी कार्यरत होतात. शरीराचे वजन आणि रक्तातील साखर दोन्ही नियंत्रणात राहतं.
तीन महिने बदाम खालल्याने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होते. त्याचबरोबर स्वादुपिंडाचे काम सुधारतं. तसेच ग्लुकोजची पातळी देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. एवढंच नाही तर, ट्रायग्लिसराइड्समध्ये देखील घट झाल्याचं दिसून आलंय.