'सलमानने माझं करिअर...', 'त्या' वादावर दोन दशकांनंतर विवेक ओबेरॉय स्पष्टच बोलला

Vivek Oberoi on Salman Khan : सलमान खाननं करिअर संपवलं? जवळपास दोन दशकांनंतर अखेर विवेक ओबेरॉययनं सोडलं मौन

दिक्षा पाटील | Updated: Sep 4, 2024, 03:49 PM IST
'सलमानने माझं करिअर...', 'त्या' वादावर दोन दशकांनंतर विवेक ओबेरॉय स्पष्टच बोलला title=
(Photo Credit : Social Media)

Vivek Oberoi on Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान म्हटलं की सर्वांना आठवतात ते म्हणजे वाद, प्रेम आणि त्याचे शत्रू. ऐश्वर्या आणि सलमान खानच्या प्रेमाची जेवढी चर्चा होती. त्यासोबतच विवेक ओबेरॉय आणि सलमानाच्या वादाची देखील तेवढीच चर्चा होते. काही वर्षांपूर्वी सलमान खान आणि विवेक ओबेरॉयचा वाद प्रचंड विकोपाला गेला होता. त्यावेळी विवेकने पत्रकार परिषद घेतं सलमान खानशी थेट पंगा घेतला होता. त्यानंतर विवेक ओबेरॉय जास्त काही चित्रपटात दिसला नाही. चांगला अभिनेता असूनही बॉलिवूडमधून तो झटक्यात गायब झाला.

विवेक ओबेरॉय आणि सलमान खानच्या दुश्मनीच्या चर्चा चालू असताना विवेक कायम उघडपणे त्यावर बोलत असतो. अशातच त्यानं यावादावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिक फराह खानच्या एका कार्यक्रमात विवेकनं यावर सविस्तरपणे चर्चा केली आहे. फराह खानच्या कार्यक्रमात बोलताना त्याने सुरूवातीला 2003 मध्ये घेतलेल्या सलमान खानविरोधातील पत्रकार परिषदेवर विधान केलं. तो म्हणाला की, 'जेव्हा पत्रकार परिषद घेण्यासाठी बसलो तेव्हा मला वाटलं की, मी काही तरी चूकीचं करतोय. पण माझ्या आतून आवाज आला की आपण हे करायला पाहिजे जे आहे ते जगासमोर आणायला पाहिजे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

त्यानंतर पुढे बोलताना तो म्हणाला की, 'जेव्हा कोणत्याही एखाद्या व्यक्तीचा प्रभाव तुमच्यावर असतो, तेव्हा आपण त्यांचं सगळं ऐकतो. मी पण तेव्हा असंच काही केलं आणि जे नाही बोलायचं होतं तेच बोलून बसलो.' अशी खंत विवेकने बोलून दाखवली.

याच शोमध्ये बोलताना विवेक ओबेरॉयने त्यावेळी त्याला मार्गदर्शन करणाऱ्या लोकांवर देखील टीका केली आहे. तो म्हणाला, 'तेव्हा जे लोकं माझ्या मागे होते आज ते सगळे गायब आहेत आणि याविषयी फार काही लोकांना माहित नाही. परंतु, त्या लोकांना मी सांगितलं होतं की, मला हे सगळं तुम्हीच बोलायला सांगितलं. पण ते लोकं म्हणाले की तू बालिश आहेस.'

सलमान खानविषयी बोलताना विवेक ओबेरॉयने सोहेल खानबाबत देखील वक्तव्य केलं आहे. 'मला सलमान खानपेक्षा सोहेल खानसाठी वाईट वाटतं. पत्रकार परिषदआधी सोहेल मला म्हणाला होता की मी सगळं बरोबर करेन' पुढे तो म्हणतो की, 'सोहेल माझ्यासाठी सलमान खानशी भांडला. मी माझ्या मित्राचं मन दुखावलं आणि त्यामुळे त्यानं मला आजपर्यंत माफ केलं नाही.'

हेही वाचा : 'डोक्यावर हेडफोन आणि कानाला फोन!' काजोलच्या लेकीच्या 'त्या' व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

या शोमध्ये स्वत: फराह खान देखील सलमान आणि विवेकच्या संबंधाबाबत यावेळी बोलताना दिसली. ती म्हणाली की, 'विवेकसोबत तू चित्रपट करू नकोसं असं मला सलमानने कधीच सांगितलं नाही.' यावरच विवेक फराहला म्हणाला की, 'मला माहिती आहे की सलमान असं कधीच म्हणाणार नाही, पण लोकं आपल्याच मनाने सगळं जोडून घेतात.'