यशराज सिनेमाच्या 'लव का दी एंड' मध्ये श्रद्धा कपूरसोबत डेब्यू करुनही ताहा शाह बदुशाला स्वतःच वेगळं स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. संजय लीला भन्साळीच्या 'हीरामंडी' मध्ये महत्त्वाची भूमिका मिळण्याअगोदरचा त्याचा काळ कठीण होता. नेटिझन्सनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ताहाला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सुशांत सिंह राजपूतसोबत तुलना केली आहे. एवढंच नव्हे त्याला 'नवा सुशांत सिंह राजपूत' म्हटलं गेलं. नुकत्याच एका मुलाखतीत, ताहाने सुशांतशी जोडल्या गेलेल्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने सांगितलं की, 'सुशांतचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करेन'.
सिद्धार्थ कन्ननशी बोलताना ताहा शाह बदुशा म्हणाला, 'मी सुशांतला वैयक्तिकरित्या ओळखत होतो. त्यामुळे बाहेरून येणं कसं असतं हे मला माहीत आहे. मी त्याचा वारसा पुढे नेऊ इच्छितो. लोकांनी मला मॅसेज करुन सांगितलं आहे की, मी त्यांचा नवा सुशांत आहे. हे किती सुंदर आहे. प्रेक्षकांनी त्याला किती प्रेम दिलं याची मला कल्पना आहे. मला फक्त चाहत्यांच्या अपेक्षा खऱ्या ठरवायच्या आहेत.
Sushant Singh Rajput सोबतची भेट आठवून ताहा शाह बदुशाने म्हटलं की, तो अतिशय फिलॉसॉफिकल आणि बुद्धिमान व्यक्ती होता. तो पुस्तकांबद्दल बोलत असायचा आणि हीच गोष्ट मला त्याच्याशी जोडून ठेवायची. पण मी त्याच्यासोबत फार वेळ घालवला नाही. आम्ही फक्त इवेंट आणि पार्टीमध्ये गप्पा मारायचो. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा आमच्यात नासाबद्दलही चर्चा झाली.
ताहा शाह बदुशाने सांगितले की, त्याने सुशांत सिंग राजपूतशी त्याच्या 'काई पो चे' चित्रपटाबद्दल चर्चा केली. कारण या चित्रपटात अमित साधच्या भूमिकेसाठी त्याची निवड केली जात होती, परंतु वयाच्या फरकामुळे ताज ती भूमिका करू शकला नाहीय