मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा, हा शो कोणाला पाहायला आवडत नाही. भारतातील जवळ-जवळ प्रत्येक घरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत लोकं शो पाहातात. हा शो गेल्या 13 वर्षांपासून लोकांच्या मनावर राज्य करत आहे. शोच्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान तयार केलं आहे. या शोच्या प्रत्येक पात्राचा एक वेगळा फॅन फॉलॉईंग आहे. कोणाला जेठालालचा शांत स्वभाव आढळतो, तर कोणाला मुनमुन दत्ताच्या अदा आवडतात. तर अनेकांना सुंदरलालचं पात्र देखील खूप आवडत आहे. लोकं कितीही कामात असले किंवा त्यांचा दिवस कितीही वाईट गेला तरी, ते हा शो पाहायला विसरत नाही.
कारण यामुळे लोकांच्या दिवसभरातील थकवा आणि टेन्शन दूर होते. म्हणूनच यासंदर्भात शोच्या मेकर्सने मोठा निर्णय घेतला आहे. शोच्या निर्मात्यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज जाहीर केले आहे. आता हा शो तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त गुदगुल्या करणार आहे. हो तुम्ही बरोबर वाचलंत आता या शोची मजा तुम्हाला आणखी एक दिवस जास्त पाहायला मिळणार आहे.
आतापर्यंत, 'तारक मेहता का उल्टा चष्मा', हा शो प्रेषकांच्या भेटीला आठवड्यातून 5 दिवस येत होता, तो आता आठड्यातून 6 दिवस येणार आहे. म्हणजेच, हा शो आता सर्व नवीन भागांसह सोमवार ते शनिवार टीव्हीवर प्रसारित केला जाईल.
चॅनेल सोनी सबने विशेष 'महासंगम शनिवार' च्या घोषणेसह हा शो आठवड्यातून सहा दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे, सिटकॉमने आतापर्यंत 3200 भाग पूर्ण केले आहेत. हा शो गेल्या 13 वर्षांपासून सतत लोकांच्या आवडत्या यादीत समाविष्ट आहे. गोकुळधाम सोसायटीच्या कुटुंबांची कथा शोमध्ये दाखवली आहे. जिथे प्रत्येक धर्म आणि संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. दररोज गोळूळधाम रहिवाशांकडे एक नवीन समस्या येते, जी प्रत्येकजण मिळून सोडवतो. परंतु प्रकरण कितीही गंभीर असले तरी हा शो तुम्हाला हसवणं काही सोडत नाही.
शोमधील मुख्य पात्र जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी, शैलेश लोढा म्हणजेच तारक मेहता, मुनमुन दत्ता जी बबिताच्या भूमिकेत आहेत.