जेठालालवर खिळली बबिताची नजर; पुढे तिनं जे केलं त्याचीच चर्चा 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो गेल्या दशकापासून टीव्हीवर राज्य करत आहे.

Updated: Mar 7, 2022, 02:17 PM IST
जेठालालवर खिळली बबिताची नजर; पुढे तिनं जे केलं त्याचीच चर्चा  title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो गेल्या दशकापासून टीव्हीवर राज्य करत आहे. ही मालिका सगळ्या वयोगटातील लोकांना प्रचंड आवडते. शोमधील जेठालाल आणि बबिता जी यांच्या पात्रांना चांगलीच पसंती मिळाली आहे. जेठालाल यांचं बबिता जीवरील प्रेम कोणापासून लपलेलं नाही. बबिता जी जिथे असते तिथे जेठालाल पोहोचतोच. आता दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जेठालालला पाहून बबिता जी स्वतःला रोखू शकली नाही
रविवारी 21 व्या आयटीए पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता यांनी उपस्थिती लावली होती. दिलीपला पाहताच मुनमुन त्याच्याकडे धावत जाते आणि नंतर जवळ येऊन त्याला शेकहँन्ड करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी मुनमुन दत्ता पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये खूपच हॉट दिसत होती. याचबरोबर दिलीप जोशी लाल ब्लेझर आणि पॅन्टमध्ये  दिसत आहे. यानंतर, दोन्ही स्टार्स कॅमेऱ्यासमोर पोज देतात आणि फोटो क्लिक करताना दिसत आहेत.

दिलीप आणि मुनमुनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळत आहे. युजर्स कमेंट सेक्शनमध्ये दिलीप जोशी यांच्यावर कमेंटचा वर्षाव करत आहेत. एका युजर्सने कमेंट करत लिहीलं आहे की, जेठालाल ईथेपण फ्लर्ट? तर दुसऱ्या एका युजर्सने कमेंट करत लिहीलंय की, टप्पूचे बाबा हेच का? तर अजून एका युजर्सने कमेंट करत लिहिलं की, जेठाजी थोडं जवळ तर जा. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, जेठाजी तर लाजत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शोचं एनिमेटेड वर्जन झालं सुरु 
तारक मेहता का उल्टा चष्मा हा एक सक्सेस शो आहे. ज्यामध्ये दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता व्यतिरिक्त शैलेश लोढा, अमित भट्ट, मंदार चांदवकर, तनुज महाशब्दे, शाम पाठक या कलाकारांनी काम केलं आहे. आता या शोचं एनिमेटेड वर्जन आलं आहे. जो 24 फेब्रुवारी 2022 पासून Netflix वर सुरू झाला आहे. विशेष म्हणजे हा शो नेटफ्लिक्सवर 'तारक मेहता का छोटा चष्मा' या नावाने सुरू करण्यात आला आहे.