Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खाननं हल्ल्या केल्यानंतर संशयित 7 ते 8 तास नंतर हल्लेखोर दादरच्या रस्त्यांवर मोकाट फिरत होता..दादरमधील विविध रस्त्यांवर असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये त्याला टिपण्यात आलंय. जेव्हा तो वांद्रे येथून निघाला तेव्हा लाल शर्ट होता आणि दादरला पोहोचला तेव्हा निळा शर्ट त्यानं परिधान केल्याचे दिसून आले. दरम्यान, त्यांनी एका दुकानातून हेडफोन खरेदी केले.
चाकू हल्ल्यानंतर आरोपीचा दादरमध्ये फेरफटका मारला. दरम्यान, या सगळ्या प्रकरणानंतर तब्बल 8 तासानंतरही आरोपी मुंबई परिसरातच कपडे बदलून दादरमध्ये फिरताना दिसला.
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर आरोपीच्या शोधासाठी पोलीस जंगजंग पछाडत होते. त्यानंतर संशयित आरोपी मुंबईच्या दादर परिसरात मोकाट फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. सैफ अली खानच्या घरातून बाहेर पडताना त्यानं टी-शर्ट घातला होता. सैफच्या घरातून बाहेर पडल्यावर त्यानं रस्त्यातच कपडे बदलले. टी-शर्ट काढून त्यानं निळ्या रंगाचा शर्ट घातला. वांद्रे स्टेशनवरुन त्यानं लोकल पकडली असावी. लोकल पकडून तो दादरच्या फुलमार्केट परिसरात आला. तिथल्या एका मोबाईल दुकानातून त्यानं पन्नास रुपयांचे हेड फोन घेतले.
आरोपी सकाळी जवळपास नऊच्या समोरास दादरमध्ये होते. पहाटे अडीच वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत आरोपी हल्ल्याच्या ठिकाणापासून अवघ्या आठ किलोमीटरच्या परिघात बिनधास्त फिरत होता. पण पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचता आलं नव्हतं. पोलिसांनी मोबाईल दुकानाचे सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहेत.
आरोपी दादरमध्ये आला तिथून कुठं गेला त्यापलिकडं आरोपीबाबत फार काही माहिती पोलिसांकडे असल्याचे दिसत नाही. आरोपी पोलिसांच्या नाकाखालून निघून गेल्यानं पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्हं निर्माण झालंय. या प्रकरणाचा तपास दया नायक सारख्या इन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्याकडं आहे तरी पोलिसांच्या हाती काहीच लागलं नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
हेही वाचा : सैफला रुग्णालयात पोहचवणाऱ्या रिक्षा चालकाला भाडं किती मिळालं?
दरम्यान, सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, शस्त्रक्रियेनंतर शुद्धीवर आल्यानंतर सैफ अली खानने त्यांना दोन प्रश्न विचारले. पहिला प्रश्न म्हणजे, 'तो शूट करू शकेल का?' यानंतर त्याने विचारलं की 'त्याला जिममध्ये जाण्यात काही अडचण आहे का?'