प्रतीक बब्बरने वडील राज बब्बर यांना दिलं नाही लग्नाचं निमंत्रण; सावत्र भाऊ आर्या बब्बर म्हणाला 'तो...'

Prateik Babbar did not Invited his family for Wedding : प्रतीक बब्बरनं लग्नासाठी वडिलांनाच दिलं नाही निमंत्रण; सावत्र भाऊ याविषयी बोलताना म्हणाला...

दिक्षा पाटील | Updated: Feb 14, 2025, 04:42 PM IST
प्रतीक बब्बरने वडील राज बब्बर यांना दिलं नाही लग्नाचं निमंत्रण; सावत्र भाऊ आर्या बब्बर म्हणाला 'तो...' title=
(Photo Credit : Social Media)

Prateik Babbar did not Invited his family for Wedding : बॉलिवूज अभिनेता राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर लवकरच प्रिया बॅनर्जीसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. पण त्यानं लग्नसोहळ्यासाठी त्याच्या कुटुंबाला आमंत्रित केलेलं नाही. त्याचे वडील राज बब्बर, भाऊ आर्य बब्बर आणि कुटुंबाचे इतर लोकांना लग्नासाठी निमंत्रण दिलेलं नाही. गेल्या सहा महिन्यांपासून प्रतीक आणि त्याच्या कुटुंबासोबतचं नातं चांगलं नाही. प्रतीकचा भाऊ आर्य बब्बरनं सांगितलं की त्याला हे कळलंच नाही की प्रतीकनं स्वत: कुटुंबाला दूर का केलं. त्यानं म्हटलं की हे संपूर्ण कुटुंबासाठी वाईट आहे आणि त्याचा त्रास होतोय. आर्यानुसार, कुटुंबानं नातं सुधारण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण हे त्याच्यासाठी पुरेसे नव्हतं. 

आर्यानं याविषयी सांगितलं की 'अशा वेळी जेव्हा सगळं काही व्हर्च्युअली आहे. मी माझं प्रेम आणि शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी व्हर्च्युएल करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचं कुटुंब, आई, वडील आणि जूहीविषयी मी माझ्या यूट्यूब चॅनल 'बब्बर साब' वर एक खास स्टॅंड-अप व्हिडीओ बनवलं होतं. त्याचं शीर्षक आहे 'बब्बर तो शादी करते रहते हैं?' हा माझा एक गंमतीशर असलेला व्हिडीओ होता. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि त्यांच्या हृदयात थोडी जागा मिळेल. काहीही झालं तरी आम्ही नेहमीच एक कुटुंब राहिन.'

प्रतीकच्या पहिल्या लग्नाविषयी बोलायचं झालं तर 2019 मध्ये त्यानंसान्या सागरसोबत लग्न केलं होतं. पण 2023 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. प्रतीक आता दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे. प्रिया बॅनर्जीसोबत तो पारंपरिक परंपरेनुसार त्यांनी सप्तपदी घेतल्या होत्या. प्रतीक आता 

हेही वाचा : लहानपणीची आणखी एक आठवण खराब, 'हेरा फेरी' चित्रपट ओरिजनल नव्हे; निघाला कॉपी

कसं आहे बब्बर कुटुंब?

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा हा मुलगा प्रतीक बब्बर आहे. तर आर्या आणि जूही बब्बर हे राज बब्बर यांची पहिली पत्नी नादिरा यांची मुलं आहेत. जूहीनं लहरेंला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की प्रतीक कायम सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्यासोबत असतो. तर प्रतीकनं काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईचं अर्थात स्मिता पाटील यांचं आडनाव लावलं.