इजिप्त : कोणाच्या खाण्यावर कोणाचा आक्षेप असू शकतो? पण एका पॉप गायीकेला खाण्याच्या कारणावरून अटक करण्यात आली आहे.
या पॉप गायिकेने आपल्या म्यूझिक व्हिडिओमध्ये उत्तेजक पद्धतीने केळी आणि इतर फळे खाल्ल्याचा तिच्यावर आरोप आहे.
इजिप्तची शायमा अहमद या व्हिडिओमध्ये फळ खात आहे. त्याचसोबत तरुण मुलांना वर्गात शिकवत आहे. मिस्त्र येथील जनता आणि इजिप्त सरकारला शायमाचा हा व्हिडिओ आक्षेपार्ह वाटला आहे.
समाजात याचा वेगळा अर्थ जात असून हा व्हिडिओ अश्लील असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
त्यामूळे तिला अटक करण्यात आली आहे. एवढच नव्हे तर तिच्या अनेक परफॉर्मन्सवरही बंदी आणण्यात आली आहे.
२१ वर्षीय शायमाने तिच्या या व्हिडिओसाठी माफी मागितलीआहे. तिचा हा व्हिडिओ आता युट्यूबवरूनही हटविण्यात आला आहे.
पण तिच्यासमोरच्या अडचणी काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीत.
शायमाने तिच्या 'कर्माची फळ' भोगली आहेत, अशा शब्दात तिची खिल्ली उडविण्यात येत आहे. या घटनेमागची सत्यता समोर येत नसली तरी सोशल मीडियावर ही शायमाला अटक केल्याची बातमी जोरदार व्हायरल होत आहे.