लहानपणीच्या फोटोंवरून दीपिका ट्रोलच्या निशाण्यावर

सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती'मधून एका राणीच्या भूमिकेत दिसणारी दीपिका पादूकोण सिनेमाच्या वादानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. 

Updated: Nov 25, 2017, 09:07 AM IST
लहानपणीच्या फोटोंवरून दीपिका ट्रोलच्या निशाण्यावर  title=

मुंबई : सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती'मधून एका राणीच्या भूमिकेत दिसणारी दीपिका पादूकोण सिनेमाच्या वादानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. 

भन्साळी यांचा 'पद्मावती' हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलाय. श्री राजपूत करणी सेनानं या सिनेमाशी संबंधितांना शीर छाटण्याचं, नाक कापण्याचं इतकंच नाही तर जिवंत जाळण्यापर्यंत धमक्या दिल्यात. 

याच दरम्यान दीपिकानं सोशल मीडियावर शेअर केलेला आपला एक लहानपणीचा फोटोही ट्रोलर्सच्या नजरेतून सुटला नाही. 

forever friends...@aditya__narayan

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकानं शुक्रवारी आपला लहानपणीचा मित्र आदित्य नारायण याच्यासोबत आपला एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर लोकांनी विचित्र कमेंट सुरू केल्या. 

'नीट कपडे घालता येत नाहीत आणि आली राणी बनायला... पद्मावती बनून' या कमेंटला वेगवेगळ्या इन्स्टाग्राम हॅन्डलनं शेअर करण्यात आलं. 

पद्मावती हा सिनेमा 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता... परंतु, ही तारीखही आता पुढे ढकलण्यात आलीय. प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये बॅन करण्यात आलाय.