नोरा फतेहीचा ओपन ड्रेसमधील बोल्ड लूक, फोटो पाहून चाहते म्हणतात...

आपल्या डान्सने वेड लावणारी अभिनेत्री नोरा फतेहीने आज अनेकांची मनं जिंकली आहेत

Updated: Oct 4, 2021, 09:44 PM IST
नोरा फतेहीचा ओपन ड्रेसमधील बोल्ड लूक, फोटो पाहून चाहते म्हणतात... title=

मुंबई : आपल्या डान्सने वेड लावणारी अभिनेत्री नोरा फतेही ने आज अनेकांची मनं जिंकली आहेत. तिची स्टाईल आणि लूक्स पाहून फॅन्स तिचे दिवाने झाले आहेत. नोराचं इंस्टाग्राम हँडल तिचं नवीन आणि सुंदर फोटोंनी भरलं आहे. गेल्या दिवसांत तिच्या रेड आऊटफिटमध्ये फोटोशूटमध्ये फँन्सला खूप आवडलं होतं. याचबरोबर नोराने एक डिझाईनर गाऊनमध्ये एक फोटो शेअर केला आहे. याचबरोबर या लूकसोबत नोराने तिचे केस मोकळे सोडले आहेत त्यामुळे नोराचं सौंदर्य अजून खुलून दिसत आहे. फँन्स या फोटोवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत आहेत. 

तुफान व्हायरल होत आहे फोटो
व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने ऑफ व्हाईट रंगाचा कटिंग ड्रेस परिधान केला आहे. हातात ब्रेसलेट आणि आणि सोडलेले मोकळे केस यामुळे तिचा हा लूक अजून खुलून दिसत आहे. या हाई थाई स्लिटमध्ये नोराने फँन्सची मनं जिंकली आहेत. पोस्टवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. एका युजरने कमेंट करत लिहीलं आहे की, तुम्ही काही पण परिधान करा तुम्ही त्यामध्ये छानच दिसतात. तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिलं की, ड्रेस उंदराने कुडतरला आहे का?

नोरा मोठ्या प्रोजेक्टवर काम करत आहे
नोरा आजकाल अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. नुकताच तिचा 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' हा चित्रपट प्रदर्शित झाला. तिने या चित्रपटातून बरीच प्रशंसा मिळवली. 'दिलबर' आणि 'गर्मी' सारख्या गाण्यांनी तिने आपली खास ओळख निर्माण केली आहे. नोरा बिग बॉसच्या घराचाही एक भाग राहिली आहे.