Nikhil Nanda Booked for Abetment To Suicide Fraud Case : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चनचा नवरा निखिल नंदा हे अडचणीत अडकले आहेत. त्यांच्या आणखी एका कंपनीच्या एका अधिकाऱ्याच्या विरोधात उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यातील दातागंज पोलिसांनी त्यांच्या आणि ट्रॅक्टर कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात पोहोचलेलं आहे आणि कोर्टानं दिलेल्या आदेशांनंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
'ईटीवी भारत' च्या रिपोर्ट्नुसार, कंपनीचे CMD निखिल नंदा यांच्यासोबत कंपनीचे UP हेड, एरिया मॅनेजर, सेल्स मॅनेजर, शाहजहांपुर डीलरसोबत आणखी तीन अधिकाऱ्यांचं नाव समोर आलं आहे. यावर ट्रॅक्टर एजंसीचे मालक जितेंद्र सिंग यांच्यावर कथितपणे आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. रिपोर्ट्सनुसार, ती तक्रार पापड हमजापुर गावाचे निवासी ज्ञानेंद्रनं दाखल केली आहे. त्यांचा भाऊ जितेंद्र सिंग दातागंजमध्ये जय किसान ट्रेडर्स नावानं ट्रॅक्टर एजंसी आहे.
सुरुवातीला जितेंद्र त्याचा को-पार्टनर लल्ला बाबूसोबत त्याचा व्यवसाय सांभाळतो. पण कुटुंबातील वादामुळे बाबू तुरुंगात गेल्यानंतर एजंसीचं काम जितेंद्र एकटे सांभाळत होते. ज्ञानेंद्रनं आरोप केला आहे की नंदा यांनी कंपनीचे अधिकारी आशीष बालियान (एरिया मॅनेजर), सुमित राघव (सेल्स मॅनेजर), दिनेश पंत (यूपी हेड), पंकज भास्कर (फाइनॅन्सर कलेक्शन ऑफिसर), अमित पंत (सेल्स मॅनेजर), नीरज मेहरा (सेल्स हेड) और शिशांत गुप्ता (शाहजहांपुर डीलर) सोबत मिळून जितेंद्रवर सेल्स वाढवण्यासाठी सतत दबाव टाकला. कथितपणे या सगळ्यांनी सेल्स टार्गेट पूर्ण न झाल्यानं त्याच्या डीलरशिप लायसेंस रद्द केलं आणि त्यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याची धकमी दिली. कथितपणे जास्त स्ट्रेस घेतल्यानं जितेंद्रनं त्याच्या कुटुंब आणि मित्रांना ही सगळी घटना सांगितली.
21 नोव्हेंबर 2024 ला कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनी कथितपणे त्याची पुन्हा एकदा भेट घेतली आणि त्यानंतर त्याच्यावर जास्त दबाव वाढला. दुसऱ्याच दिवशी, 22 नोव्हेंबर रोजी, जितेंद्रनं आत्महत्या केली. जितेंद्रच्या कुटुंबाचा असा दावा आहे की न्यायालयानं हस्तक्षेप करेपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. न्यायालयाच्या निर्देशानंतर, आता सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : Chhaava : इथं तिकिट मिळेना अन् 'या' शहरात आठवडाभरा महिलांना मोफत पाहता येणार 'छावा'
जितेंद्रचे वडील शिव सिंग यांनी सांगितलं की निखिल नंदा यांच्या संबंधांविषयी माहित नव्हतं. पण त्यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूसाठी कंपनीला जबाबदार ठरवलेलं आहे. त्यांनी म्हटलं की मला माहित नाही की ते कोण आहेत. आम्हाला न्याय हवा आहे. या सगळ्यात दातागंज पोलिस स्टेशनमध्ये प्रभारी गौरव विश्नोईनं तपास केल्यास या प्रकरणात तपास सुरु असल्याचं समोर आलं आहे. निखिल नंदा विषयी बोलायचं झालं तर तो फक्त अभिषेक बच्चनचा मेहुणा नाही तर त्यासोबत राज कपूर यांची मुलगी रितु नंदा यांचा मुलगा आहे. ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर हे त्यांचे मामा आहेत. तर करिश्मा कपूर, करीना कपूर खान आणि रणबीर कपूर चुलत भावंडं आहेत. दरम्यान, अमिताभ यांची लेक श्वेता ही नवरा निखिल नंदासोबत न राहता वेगळी राहत असल्याचं म्हटलं जातं. तर श्वेता ही वेगळी राहत असून वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांच्याच घरी राहत असल्याच्या चर्चा आहेत.