‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याच्या मुलीचं थाटामाटात लग्न, फोटो व्हायरल

सध्या कलाविश्वात सर्वत्र लग्नाचे वारे वाहात आहेत. 

Updated: Dec 12, 2021, 04:37 PM IST
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याच्या मुलीचं थाटामाटात लग्न, फोटो व्हायरल  title=

मुंबई  : सध्या कलाविश्वात सर्वत्र लग्नाचे वारे वाहात आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना हसवणारे विनोदी कलाकार म्हणजे ‘दादूस’ उर्फ लोकप्रिय अभिनेते अरुण कदम यांच्या मुलीचं देखील लग्न झालं आहे. अरुण कदम यांच्या मुलीचं नाव सुकन्या कदम आहे. खुद्द सुकन्याने लग्नाचे  काही फोटो स्वतःच्या इन्स्टाग्रम अकाउंटवर शेअर केले आहे. फोटोमध्ये सुकन्या सुंदर दिसत आहे. आयुष्यात नवा प्रवास सुरू केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sukanya Arun (@aai.aai.ya.suku.suku)

 

अरुण यांची मुलगी सुकन्या कदमचा ऑगस्ट महिन्यात साखरपुडा झाला होता. मात्र आता तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुलीच्या लग्नात अरुण कदम भावूक झाल्याचे दिसून आले. एवढंच नाही तर त्यांनी मुलीसोबत गाण्यावर ठेका देखील धरला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

25 नोव्हेंबर रोजी सुकन्याने बॉयफ्रेंड सागर पावळेसोबत रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यानंतर मात्र थाटामाटात त्यांचं लग्न झालं. लग्न सोहळ्यात कुटुंबातील काही जवळच्या व्यक्ती आणि मोजक्याच मित्रपरिवाला आमंत्रण दिल्याचे सांगितलं जात आहे.

अरुण कदम यांची मुलगी सुकन्या ही कमर्शिअल आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर आहे. शिवाय ती उत्तम भरतनाट्याम डान्सर आहे. लॉकडाउनच्या काळात तिने वडिलांसोबत अनेक टिकटॉक व्हिडीओ केले. जे तुफान व्हायरल झाले. आता सुकन्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.