'तुला हवं तर विवाहबाह्य संबंध ठेव, मला हवं तर मी ठेवेन,' कबीर बेदी यांचं पहिल्या पत्नीसह ओपन मॅरेज

Kabir Bedi Open Marriage: "जर आपला कल असा असेल की तिला प्रेमसंबंध ठेवायचे असतील आणि मलाही प्रेमसंबंध ठेवायचे असतील, तर आपण करू शकणारी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे खुले लग्न करणे," असं कबीर बेदी म्हणाले आहेत.  

शिवराज यादव | Updated: Jan 29, 2025, 03:26 PM IST
'तुला हवं तर विवाहबाह्य संबंध ठेव, मला हवं तर मी ठेवेन,' कबीर बेदी यांचं पहिल्या पत्नीसह ओपन मॅरेज title=

Kabir Bedi Open Marriage: बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी (Kabir Bedi) आपल्या आगळ्या वेगळ्या करिअर आणि तितक्याच चढउतार असणाऱ्या वैयक्तिक आयुष्यासाठी ओळखले जातात. नुकतंच त्यांनी आपली पहिली पत्नी ओडिशी नर्तक प्रोतिमा बेदी (Protima Bedi) यांच्यासह केलेल्या ओपन मॅरेजवर भाष्य केलं आहे.

कबीर बेदी आणि प्रोतिमा यांच्या नात्यात प्रेम, आव्हानं, अपारंपारिक निर्णय यांचा समावेश आहे. यामध्ये आपली दोन मुलं पूजा आणि सिद्धार्थ यांचा सांभाळ करण्यासाठी लग्न टिकून राहावं याकरिता ओपन रिलेनशिपची निवड करण्याचाही समावेश आहे. "जेव्हा तुम्ही भूतकाळाचा विचार करता, तेव्हा काही खंत असतात. प्रत्येकाला आपण हे थोडं वेगळ्या प्रकारे करु शकलो असतो असं वाटतं," असं कबीर बेदी यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

कबीर बेदी यांनी खुलासा केला आहे की, आमच्या मुलांमुळेच आम्ही एकत्र होतो. "त्यावेळी आम्हाला वाटलं की, जर आम्हाला एकत्र राहायचं असेल तर ते मुलांसाठी असेल. त्यात आमचा कल असा होता की, जर तिला प्रेमसंबंध ठेवायचे असतील आणि मलाही विवाहबाह्य संबंध ठेवायचे असतील तर ओपन मॅरेज हा सर्वोत्तम पर्याय आहे. तू तुला जे हवं ते कर आणि मी मला जे हवं ते करेन. आपण एकत्र राहू आणि मुलांना पालक म्हणून एकत्रित सांभाळू. पण ते अपक्षेप्रमाणे झालं नाही. ती फार कठीण गोष्ट होती".

जरी त्यांचं लग्न तुटलं, तरी त्यांनी त्याचा परिणाम मुलांवर होऊ दिला नाही. "आम्ही वेगळे झालो असलो, घटस्फोट घेतला असला तरी आम्ही सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. मी तिला माझं घर आणि पाठिंबा दोन्ही दिलं. आम्हाला दोन मुलं असल्याने आम्ही आयुष्यभर मित्र म्हणून राहिलो. आम्हाला मुलांना जाणवून द्यायचं होतं की, जरी पालक एकत्र राहत नसले तरी ते आपले पालक आहेत".

खुल्या नातेसंबंधांच्या म्हणजेच ओपन रिलेशनशिपच्या व्यवहारिकतेवर आणि भावनिक तसंच कौटुंबिक गतिशीलतेतून मार्गक्रमण करताना दीर्घकालीन वचनबद्धता टिकवून ठेवण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.

परस्पर संमती असूनही खुले नातेसंबंध अनेकदा अपयशी ठरतात कारण भावनिक वास्तव नेहमीच अपेक्षांशी जुळत नाही. "दोन्ही भागीदार बौद्धिकदृष्ट्या एकपत्नीत्व न करण्यास सहमत असले तरी, मत्सर, असुरक्षितता किंवा भावनिक दुर्लक्ष अनपेक्षितपणे दिसून येऊ शकते. कठीण भावनांना उघडपणे संबोधित न केल्यास अनेकांना निष्क्रिय-आक्रमकता, टाळाटाळ किंवा रागाचा सामना करावा लागतो. संलग्नक शैली देखील भूमिका बजावतात," असं दॅट कल्चर थिंग येथील अस्तित्वात्मक मानसोपचारतज्ज्ञ बरुआ म्हणतात.