'ढिंढोरा' गाण्यातील जया बच्चन यांचा लूक व्हायरल, रौद्र रुप आणि लालभडक चेहरा; नेटकरी म्हणतात...

Dhindora Song Jaya Bachchan Trolled: जया बच्चन यांना अनेकदा ट्रोल केले जाते त्यातून यावेळी त्यांच्या रागीट चेहऱ्यामुळे नेटकऱ्यांना यावेळीही राहावलेले नाही. त्यातून सध्या प्रदर्शित झालेल्या 'ढिंढोरा' या गाण्यामुळे या सर्वच चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या त्याच रागीट स्वभावाची. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 25, 2023, 06:15 PM IST
'ढिंढोरा' गाण्यातील जया बच्चन यांचा लूक व्हायरल, रौद्र रुप आणि लालभडक चेहरा; नेटकरी म्हणतात...  title=
July 25, 2023 | jaya bachchan gets trolled for her angery face in dhindora song

Dhindora Song: अभिनेत्री जया बच्चन यांच्याबद्दल अनेकदा चर्चा रंगलेली असते. आपल्या रागामुळे त्या अनेकदा सर्वांना खडेबोल सुनावत असतात. सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'तील नुकत्याच आलेल्या एका गाण्याची. यावेळी जया बच्चन यांचा रावडी आणि रागीट अवतार आपल्याला पाहायला मिळतो आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंग हे गाण्यावर नाचताना असतात. तेवढ्यातच जया बच्चन या अगदी रागट नजरेत दिसत आहेत. तेव्हा त्यामुळे त्यांना ट्रोलर्सनी चांगलेच उत्तर दिले आहे. जया बच्चन या जशा वास्तवात आहेत तश्यात या पिक्चरमध्येही दिसत आहेत असं म्हणताना दिसत आहेत. यावेळी म्हणूनच त्यांची चांगलीच खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून यावेळी या चित्रपटाची गाणीही सध्या गाजताना दिसत आहेत.

What Jhumka या गाण्यानंतर आता सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'ढिंढोरा' या गाण्याची. या गाण्याबद्दल सध्या चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या गाण्यात लाल भडक सेट, आकर्षक सजावट, दुर्गा मातेची पुजा, लाल गुलाल अशाप्रकारे भडक रंगाचा पुर्ण सेट आहे त्यामुळे सध्या या गाण्याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या वेळी या गाण्यातील भव्यता पाहूनच आपण सगळेच त्याच्या प्रेमात पडूच. यावेळी हे गाणंही प्रचंड गाजतं आहे. त्यामुळे सध्या हे गाणं चांगलंच चर्चेत आहे. यावेळी या गाण्याच्या रिदमलाही चांगलाच प्रतिसाद येताना दिसतो आहे. त्यामुळे या गाण्याची चांगलीच चर्चा रंगते आहे. आता या गाण्यावरून एक वेगळीच चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते आहे. त्यामुळे चर्चांना उधाण झालं आहे. 

हेही वाचा - Oppenheimer Contro: सेक्स सीन दरम्यान भगवतगीता वाचन; 'महाभारता'तील श्रीकृष्णानं केलं समर्थन!

सध्या या गाण्यामध्ये जया बच्चन दिसत आहेत. त्याचसोबत या गाण्यात तुम्ही पाहू शकता की, जया बच्चन या प्रचंड प्रमाणात रागात आणि द्वेषानं आलिया आणि रणवीरकडे पाहताना दिसत आहेत. यावेळी राणी म्हणजे बंगाली मुलगी आणि रॉकी म्हणजे बंगाली मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत जे यावेळी आपल्या परिवाराचा विरोध पत्करून आहेत. तरीही त्यांच्यात तेवढंच प्रेम आहे त्यांच्यातलं प्रेम हे अजिबातच कमी झालेलं नाही. त्यातून जया बच्चन यांचा असा रागीट चेहरा पाहून सगळंच जण आश्चर्यचकीत झालेले नाहीत. ते उलट म्हणतायत की, जया बच्चन या वास्तवात जशा आहेत तशाच येथेही दिसून येत आहेत. 

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 जूलैला प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.