मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनची चुलत बहीण लवकरच पश्मिना (Pashmina) लवकरच रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. पश्मिना संगीत संयोजक राजेश रोशन यांची मुलगी आहे. राजेश रोशन हे ऋतिकचे काका आहेत. त्यामुळे आता अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर, अन्यना पांडे यांच्यानंतर पश्मिना चाहत्यांच्या मनात आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घर करण्यासाठी सज्ज झाली आहे. खुद्द ऋतिकने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे.
सोशल मीडियावर ऋतिकने आपल्या बहिणी प्रती भावना व्यक्त केल्या आहेत, तो म्हणाला 'मला तुझ्यावर फार गर्व आहे. तुझ्यात असलेल्या असामान्य कौशल्यामुळे तू अत्यंत खास आहेस. मला कधी कधी आश्चर्य वाटतं तुझ्यात अशी जादू आली कशी. मी देवाकडे तुझ्या भावी आयुष्यासाठी नक्की प्रार्थना करेल.' अशा शब्दांत शुभेच्छा देत त्याने त्याच्या बहिणीला स्टार म्हणून संबोधले आहे.
दरम्यान, पाश्मिनाने रंगमंचावर काम केलं आहे. 'द जेफ गोल्डबर्गद्वारा द एम्पोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट' प्रॉडक्शनमध्ये तिने काम केले आहे. आता मोठ्या पडद्यावर झळकण्याच्या तयारीत आहे. पाश्मिना कोणत्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.