Yo Yo Honny Singh Upcoming Concert: भारतीयांना खऱ्या अर्थाने रॅप गाण्यांची ओळख करुन देणारा लोकप्रिय गायक म्हणजे 'यो यो हनी सिंग'. फक्त बॉलिवूड किंवा सोशल मीडियावरच नाही तर क्लब्स किंवा पार्टीमध्ये या रॅपर्सची गाणी वाजतातच. त्याला 'कलास्टार' आणि 'देसी कलाकार' या दोन गाण्यांमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर हनी सिंगचे एकामागुन एक दमदार रॅप सोग्न्स आणि अॅल्बम्स हिट होत गेले. आता हनी सिंगने त्याच्या 'यो यो हनी सिंगःफेमस' या नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्रीच्या रिलीजनंतर भारत दौऱ्याची घोषणा केली आहे. चाहत्यांमध्ये या टूरबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे.
हनी सिंगच्या भारतातील कॉन्सर्ट्सचे टिकिट्स जोमॅटो डिस्ट्रिक्ट अॅपद्वारे विकले जातील. या टिकिट्सची विक्री शनिवार, 11 जानेवारी दुपारी 2 वाजल्यापासून सुरू होईल. कार्यक्रमाची एकूण वेळ चार तास आहे. हनी सिंगच्या काही गाण्यांच्या विषयामुळे हा कार्यक्रम 16 वर्षांखालील प्रेक्षकांसाठी नाही. टिकिट्सच्या किंमतीबाबत अद्याप कोणती माहिती उपलब्ध झालेली नाही मात्र हनी सिंगचे चाहते या कॉन्सर्टसाठी खूप उत्सुक आहेत.
हनी सिंग 22 फेब्रुवारीपासून टूरची सुरुवात मुंबईतून करणार तर 5 एप्रिलला कोलकतामध्ये या टूरचा शेवट होईल. प्रत्येक शोची वेळ संध्याकाळी 6 वाजता असेल. कार्यक्रमस्थळाचे गेट शोच्या अर्ध्या तासा आधी उघडले जातील.
तारखा आणि शहरांची यादी:
मुंबई: 22 फेब्रुवारी
लखनऊ: 28 फेब्रुवारी
दिल्ली: 1 मार्च
इंदौर: 8 मार्च
पुणे: 14 मार्च
अहमदाबाद: 15 मार्च
बंगळुरू: 22 मार्च
चंदीगड: 23 मार्च
जयपूर: 29 मार्च
कोलकाता: 5 एप्रिल
हे ही वाचा: 45 कोटींमध्ये बनवण्यात आला भारतातील सगळ्यात फ्लॉप सिनेमा; चित्रपटामुळे इंडस्ट्रीचं 99.99 % नुकसान
टिकिट्स फक्त @district.bulletin या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील. हनी सिंगने चाहत्यांना इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना आवाहन केलं की, "माझ्या आयुष्याच्या कहाणीचा अनुभव घ्या. हा करमपुराच्या गल्ल्यांपासून करोडपती होईपर्यंतचा प्रवास आहे. हा टूर फक्त शो नाही, ही माझी कहाणी आहे". तुम्ही देखील या अनुभवाचा भाग होण्यासाठी तयार आहात ना? असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.